Suspended : श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी पोलीस (Police) ठाण्यातील कर्मचाऱ्याने राजकीय व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना देत कार्यक्रमासाठी पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये (Social media) व्हायरल झाला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्या कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची (Suspended) कारवाई करत त्या कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशीचे आदेश काढले. भाऊसाहेब ज्ञानदेव शिंदे असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
हे देखील वाचा: अण्णा हजारे यांना पहिलं जागं करा; संजय राऊत यांचा खाेचक सवाल
व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल
बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी भाऊसाहेब ज्ञानदेव शिंदे हे २० फेब्रुवारीपासून रजेवर होते. या काळात त्यांनी एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना देत असताना या कार्यक्रमासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले.
नक्की वाचा: महत्त्वाची बातमी! नगरसह अनेक रस्त्यांच्या वाहतुकीत बदल; असा असेल बदल
चौकशी करत निलंबनाची कारवाई (Suspended)
याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित कर्मचाऱ्याची प्राथमिक चौकशी करत पोलीस कर्मचारी भाऊसाहेब शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले.