Suspended : श्रीगोंद्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार निलंबित

Suspended : श्रीगोंद्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार निलंबित

0
Suspended : श्रीगोंद्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार निलंबित
Suspended : श्रीगोंद्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार निलंबित

Suspended : श्रीगोंदा : तालुक्यात गाजलेल्या चर्च जमिनीच्या शासकीय आदेशात अनियमितता करत महसूल (Revenue)वन विभागाच्या (Forest Department) आदेशानुसार, एका संस्थेचे नाव बदलून खाजगी व्यक्तींना मालकी हक्क बहाल करण्याच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे चौकशी दरम्यान स्पष्ट झाल्याने श्रीगोंदा तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे (Dr. Kshitija Waghmare) तसेच नायब तहसीलदार अमोल बन यांना अवर सचिव प्रवीण पाटील यांनी निलंबन केल्याचे आदेश काढले. या आदेशाने श्रीगोंदा तहसील कार्यालयातील (Shrigonda Tehsil Office) कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित;विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची घोषणा

कामात अनियमितता केली असल्याची तक्रार

श्रीगोंदा शहरातील ” दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ खाईस्ट इतर वेस्टर्न इंडिया” या संस्थेचे नाव कमी करुन “द कॅनेडीयन प्रेस ब्रिटेरियन मिशन” करीता खासगी व्यक्त्तीच्या नावे मालकी हक्काचे आदेश श्रीगोंदा तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे तसेच नायब तहसीलदार अमोल बन यांनी करत कामात अनियमितता केली असल्याची तक्रार तक्रारदार यांनी केली. या प्रकरणी चौकशी होऊन महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, एका संस्थेचे नाव बदलून खाजगी व्यक्तींना मालकी हक्क बहाल करण्याच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याच्या आढळून आले.

अवश्य वाचा : माध्यमिक शिक्षक सोसायटीत ‘परिवर्तन’

शासकीय कर्तव्यात कसूर (Suspended)

सदर प्रकरणी शासकीय कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता व औचित्य न ठेवल्याने कर्तव्यात कसूर करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले असल्याचा ठपका ठेवत शासकीय कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ व शिस्त व अपील नियम १९७९ नुसार त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश अवर सचिव प्रवीण पाटील यांनी काढत तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे तसेच नायब तहसीलदार अमोल बन यांचे निलंबन केल्याचे आदेश काढले.