Suspension : नगर : महापालिकेतील (AMC) दोन कर्मचाऱ्याचा सोशल मीडियावर (Social Media) हफ्तेखोरीबातचा ऑडिओ व्हायरल झालेल्या दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची (Suspension) कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांची विभागीय चौकशी होणार असल्याचे महापालिका आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी तसे आदेश दिले आहेत.
नक्की वाचा : कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा ; खासदार नीलेश लंके यांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी
सोशल मीडियावर ऑडिओ झाला व्हायरल
लिपिक अमित राजू पालवे व शिपाई उमेश दिगंबर शेंदूरकर असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. महापालिकेतील विभाग प्रमुख प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३०० ते ५०० रुपयांचा हफ्ता घेत असल्या बाबतचा सोशल मीडियावर ऑडिओ व्हायरल झाला होता. त्यात वसुली करणारे कर्मचारी असून हे महापालिका विभाग प्रमुखाना दररोज ३०० ते ५०० रुपये हफ्ता देत असल्याचे बोलले जात आहे.
अवश्य वाचा : ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही – अजित पवार
विभागीय चौकशीचे दिले आदेश (Suspension)
यावेळी आपण सगळ्यात जास्त हफ्ता दिला. तुमचा १०० रुपये भरणा दाखविला आहे. ते पैसे कोणी दिले. एकतर माळीवाडा येथे कोणी पैसे देत नाही. तुम्ही पैसे घेता तर बोलत नका जाऊ, पैसे घेत नसतील तर गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही पैसे घेता तरी बोलता असे कसे चालेल, दोन कर्मचाऱ्यांमधील संवादचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची आयुक्त डांगे यांनी दाखल घेतली असून दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून त्यांची विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.