Swachhta hi seva : नगर महापालिकेच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा उत्साहात प्रारंभ; स्वच्छतेवरील गीत अनावरण

Swachhta hi seva : नगर महापालिकेच्या 'स्वच्छता ही सेवा' अभियानाचा उत्साहात प्रारंभ; स्वच्छतेवरील गीत अनावरण

0
Swachhta hi seva

Swachhta hi seva : नगर : महापालिकेतर्फे (Municipality) आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ (Swachhta hi seva) या अभियानाचा आज (बुधवारी) प्रारंभ करण्यात आला. दुनियादारी फेम अभिनेत्री उर्मिला कानेटकर (Urmila Kanetkar), आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी संदेश दिला. अभिनेत्री कानेटकर, आयुक्त डांगे यांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. स्वच्छतेवर आधारित जिंगलचे अनावरण करत अभिनेत्री कानेटकर यांनी त्यावर ठेका धरला. पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी नगरकरांना स्वच्छतेची साद घातली.

Swachhta hi seva

नक्की वाचा: ‘जरांगेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तर मीडियामध्ये राहायचं’-परिणय फुके

न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या प्रांगणात सोहळ्याचे आयोजन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. नगर शहरात न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या उद्घाटन सोहळ्यास मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्वस्त रामचंद्र दरे, विश्वासराव आठरे, जयंत वाघ, दीपक दरे, राजेश्वरी म्हसे महाविद्यालय, शाळांचे प्राचार्य, बाळासाहेब सागडे, विजयकुमार पोकळे, महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, प्रियंका शिंदे, निखिल फराटे, मुख्य लेखाधिकारी सचिन धस, सहायक आयुक्त मेहेर लहारे, सहायक आयुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, प्रसिध्दी अधिकारी शशिकांत नजान, अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ, संगणक विभाग प्रमुख अंबादास साळी, अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ तसेच परिक्षीत बिडकर, लक्ष्मण लांडगे आदी उपस्थित होते.

Swachhta hi seva

अवश्य वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज!महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार

एक पेड मा के नाम वृक्षारोपण उपक्रम (Swachhta hi seva)

अभियानांतर्गत एक पेड मा के नाम वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. यात महाविद्यालय परिसरात २७ झाडे लावण्यात आली. स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी तयार केलेल्या गाण्यांवर झुम्बा डान्सद्वारे विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने हार, बुके, शाल, नारळला फाटा देत रोपे देऊन उपस्थितांचे स्वागत केले. मनपाचे सफाई मित्र व जिंगल गायिका मीनल पेडगावकर यांचा ही सत्कार करण्यात आला.
स्वच्छता मोहिमेत न्यू आर्ट्स कॉलेज ते दिल्लीगेट या रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वतः अभिनेत्री कानेटकर व आयुक्त डांगे यांनी झाडू हातात घेत स्वच्छता केली. रांगोळीद्वारे स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. एनएसएस, एनसीसीच्या विद्यार्थ्यांनीही प्रामुख्याने सहभाग नोंदवला. स्वच्छतेबाबतचे विविध संदेश फलक झळकावून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या घोषणा दिल्या. 

Swachhta hi seva

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, कोणत्याही शहराची ओळख ही स्वच्छतेतून दिसते. आपले शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहते. महानगरपालिका स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवून उपाययोजना करत आहे. शहरात १८ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहीम, जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीक, विद्यार्थी, पालकांनी स्वच्छता विषयक अडचनींसाठी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आयुक्त डांगे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.