Swapnil Kusale:अभिमानास्पद! मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक 

महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे.

0
Swapnil Kusale:स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक,कसा आहे त्याचा प्रवास ?
Swapnil Kusale:स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक,कसा आहे त्याचा प्रवास ?

Swapnil Kusale : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) महाराष्ट्राच्या मुलाने नाव काढले आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale) ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक (Bronze Medal) पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण ४५१.४ गुण प्राप्त केले. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्यपदक आहे. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. विशेष बाब म्हणजे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्नील हा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

नक्की वाचा : पुण्यात पुन्हा पावसाची संततधार;हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

स्वप्नील आणि खाशाबा जाधव यांच्या खेळाचा योगायोग (Swapnil Kusale)

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. ही तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. तसाच पराक्रम करणारा स्वप्नील हा दुसरा मराठमोळा खेळाडू बनला आहे. विशेष म्हणजे,हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे आहेत.

कोण आहे स्वप्नील कुसळे ? (Swapnil Kusale)

स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे. ६ ऑगस्ट १९९५ मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलने पॅरिसमध्ये आपली चमक दाखवली. अभिनव बिंद्राला २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने १२ वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला होता. २००९ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.

अवश्य वाचा : हिमाचल प्रदेशातील शिमला,मंडी मध्ये ढगफुटी ;३०जणांचा मृत्यू


स्वप्नील कुसाळे हा २०१५ पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता. त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. भारताचा हा नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभावाचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्नीलने आपल्या पात्रता फेरीच्या कामगिरीनंतर सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here