Swargate Rape Case:पुणे हादरलं!स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार

0
Swargate Rape Case:पुणे हादरलं!स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार
Swargate Rape Case:पुणे हादरलं!स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार

Swargate Rape Case : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात (Swargate bus stand) एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमधे बलात्कार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी (Pune Crime) आणि महिलांवरील अत्याचारांचा घटनांचा मुद्दा तापला असताना गुन्हेगारी विश्वातून आणखी एक प्रकरण समोर आल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट पसरली आहे.राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दाखल घेतली आहे.

नक्की वाचा :  CBSE बोर्डाचे दहावीच्या परीक्षेबाबत नवे धोरण;वर्षातून दोनदा होणार परीक्षा 

फलटणला निघालेल्या तरुणीवर स्वारगेट बस डेपोत अत्याचार (Swargate Rape Case)

स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पीडित तरुणी ही स्वारगेटवरुन फलटणला जात होती. तेव्हा आरोपींनी तरुणीला फलटणला जाणारी बस आहे,असं सांगून दुसऱ्या बसमध्ये जायला सांगितले.तिथेच तिच्यावर अत्याचार करण्यात आला.आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे (वय ३६) असून तो जामिनावर सुटलेला आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर शिक्रापूर इथे गुन्हे दाखल आहेत.

अवश्य वाचा :  मोठी बातमी!संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती  

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या ?(Swargate Rape Case)

२५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. “पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. मात्र स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. त्यानंतर मुलीने सकाळी साडे नऊ वाजता पोलिसांत तक्रार नोंदवली. यात पोलिसांकडून जातीने लक्ष घातलं जातंय. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेने केलेल्या वर्णनानुसार माहिती गोळा केली जात आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तयार केले असून ग्रामीण भाग आणि स्वारगेट भागात तपास सुरू आहे. आरोपीचा सीडीआर काढला आहे, त्यानुसार लोकेशननुसार त्याचा माग काढला जात आहे”,असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here