Swargate Rape Case:स्वारगेट अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड.अजय मिसर यांची नियुक्ती

0
Swargate Rape Case:स्वारगेट अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड.अजय मिसर यांची नियुक्ती
Swargate Rape Case:स्वारगेट अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड.अजय मिसर यांची नियुक्ती

नगर : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये (Pune Swargate ST Bus Depo) झालेल्या लैंगिक अत्याचार (Sexual assault) प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या खटल्यासाठी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड.अजय मिसर (Adv. Ajay Misar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात ९२३ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

नक्की वाचा : मराठवाड्यात तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या 

स्वारगेट प्रकरणात आतापर्यंत काय घडलं ?(Swargate Rape Case)

स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे पावणेसहा ते पावणे सातच्या दरम्यान घडली होती. याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा सध्या येरवडा कारागृहात आहे. पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याची २ दिवसांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवले आहेत. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर गाडेची चौकशी होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये ८२ साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले आहेत. तर एकूण बारा पंचनामे करण्यात आले आहेत. पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे व घटनेतील भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत.

अवश्य वाचा : पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश  
स्वारगेटमध्ये हा सर्व प्रकार घडल्यानंतर सर्व एसटी बस स्टँड येथील जुन्या भंगारात पडलेल्या बसेस आणि गाड्या हटवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. त्यासाठी १५ एप्रिल ही डेडलाइन देण्यात आली होती. मात्र परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांनी याबाबत अजून योग्य ती कारवाई सुरू केली नसल्याचे आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here