Swargate Rape Case:’चौकशीनंतर नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी’;आरोपी दत्ता गाडेच्या भावाची मागणी 

0
Swargate Rape Case:'चौकशीनंतर नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी';आरोपी दत्ता गाडेच्या भावाची मागणी 
Swargate Rape Case:'चौकशीनंतर नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी';आरोपी दत्ता गाडेच्या भावाची मागणी 

नगर : ‘चौकशीनंतर नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी,अशी मागणी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील (Swargate Rape Case) आरोपी दत्ता गाडेच्या (Accused Datta Gade) भावाने केली आहे. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचा भाऊ आणि आरोपीचे वकील वाजिद खान व साजीद शाह यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ही मागणी (demand) करण्यात आली आहे.

नक्की वाचा : बापरे!संपत्तीसाठी मुलीची स्वतःच्या आईला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

‘या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी’ (Swargate Rape Case)

यावेळी आरोपीच्या भावाने सांगितले की, आरोपी दत्ता गाडे गुलटेकडी भाजी मार्केट यार्डममध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. भाजीपाला विकून येत असताना स्वारगेट बस डेपोमध्ये हा प्रकार घडला. आमचा पोलीस यंत्रणेवर व न्यायालयावरही  विश्वास आहे. ज्या पीडित महिलेबरोबर ही घटना घडली, त्यांनाही न्याय मिळायला हवा. न्यायालय जो निकाल देईल, तो आम्हाला मान्य असेल. न्यायालयाने दत्ता गाडेला फाशीची शिक्षा दिली, तरी आम्हाला मान्य आहे. त्याचे आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, असं त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार  

‘माध्यमांनी नाण्याची एकच बाजू दाखवली’ (Swargate Rape Case)

मागील तीन दिवस माध्यमांनी फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली. चौकशीनंतर नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी,असे आवाहन आरोपी दत्ता गाडेच्या भावाने केले आहे. “गावातल्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आमच्याशी संपर्क ठेवण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही”,असेही आरोपीच्या भावाने सांगितले.यावेळी दत्ता गाडेवर दाखल असलेल्या सात गुन्ह्यांबाबत बोलताना त्याने सांगितले की, त्याच्यावरील गुन्ह्यांची आम्हाला कल्पना आहे. सातपैकी एका गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.

‘भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे आपण त्याच्याशी फार बोलत नव्हतो,असेही गाडेच्या भावाने सांगितले.तसेच तो गावातून भाजीपाला उचलून शहरात आणून विकण्याचे काम करत होता. तो माझा भाऊ असला तरी तो जर गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहीजे,अशीही स्पष्ट भूमिका गाडेच्या भावाने मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here