Swasth Nari Sashakt Parivar Abhiyaan : ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानास निंबळकमध्ये प्रतिसाद

Swasth Nari Sashakt Parivar Abhiyaan

0
Swasth Nari, Sashakt Parivar Abhiyaan : 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानास निंबळकमध्ये प्रतिसाद
Swasth Nari, Sashakt Parivar Abhiyaan : 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानास निंबळकमध्ये प्रतिसाद

Swasth Nari Sashakt Parivar Abhiyaan : नगर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने केंद्र सरकार (Central Government) आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या (Public Health Department of the Government of Maharashtra) वतीने ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान (Swasth Nari Sashakt Parivar Abhiyaan) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गरोदर महिला, माता, किशोरवयीन मुली आदींच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराला निंबळक येथील आरोग्य उपकेंद्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी ( १९ सप्टेंबर ) या शिबिरात १६० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर ८० रुग्णांची डोळे तपासणी करण्यात आली.

अवश्य वाचा: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार

सरपंच प्रियंका लामखडे यांच्या हस्ते शुभारंभ

या अभियानाचा शुभारंभ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता जाजगे, सरपंच प्रियंका लामखडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निंबळक सेवा सोसायटी संचालक पोपट खामकर, शिवाजी गेरंगे, भानुदास कोतकर (सर) उपस्थित होते.

नक्की वाचा : शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

महिलांना कॅन्सर विषयक समुपदेशन (Swasth Nari Sashakt Parivar Abhiyaan)

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अपूर्वा फिरोदिया, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती शिंदे, डॉ. चेतन शेळके आदींनी रुग्णांची तपासणी केली.
डॉ. मानसी कांबळे यांनी उपस्थित महिलांना कॅन्सर विषयक माहिती देत समुपदेशन केले. महिलांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

अभियानाच्या यशस्वितेसाठी डॉ. सुमित आंबेडकर, सतीश गेरंगे, पूजा लोखंडे, कविता साळवे यांच्यासह आशा सेविकांनी परिश्रम घेतले. केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि स्नेहालय संस्थेचे सहकार्य लाभले.


रक्तदान हे जीवनदान : गायकवाड

अपघात, शस्त्रक्रिया किंवा प्रसूतिकाळात रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. यावेळी जर वेळेत रक्त उपलब्ध झाले नाही तर रुग्ण दगावू शकतो किंवा दगावतोच. रक्तदान केल्याने रुग्णास जीवनदान मिळते. त्यामुळेच रक्तदान हे केवळ दान नसून जीवनदान आहे, असे मत निंबळक सेवा सोसायटीचे चेअरमन भाऊराव गायकवाड यांनी व्यक्त केले. अभियानांर्गत शनिवारी ( २० सप्टेंबर ) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच बाळासाहेब कोतकर, गोरख चव्हाण, महादेव गवळी, नामदेव लोंढे, संदीप गेरंगे आदी उपस्थित होते. संतोष सुरवसे, कृष्णा पंडित, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. वसंत झेंडे, डॉ. विलास मढीकर आदींनी रक्त संकलन केले. सुमारे २० तरुणांनी रक्तदान केले.