T-20 Cricket : नगर : अहिल्यानगर शहराजवळील जामखेड रस्त्यावर असलेल्या भारतीय सैन्याच्या (Indian Army) वैद्य स्टेडियममध्ये अहिल्यानगर क्रिकेट लीग टी-२० स्पर्धा (T-20 Cricket) २३ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत झाली. या स्पर्धेचा अंतिम सामना काल (ता. १२) हुंडेकरी ॲकॅडमी (Hundekari Academy) विरुद्ध पायनियर संघांत खेळवण्यात आला. या सामन्यात हुंडेकरी ॲकॅडमीने पायनियर संघाचा १५ धावांनी पराभूत करत अजिंक्यपद मिळवले.
अवश्य वाचा : खोक्या भोसलेला प्रयागराज न्यायालयात का हजर करणार?

नक्की वाचा : ‘सुरेश धस यांना समज द्या’;पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी
भारतीय सैन्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन
भारतीय सैन्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर शहरात टर्फ क्रिकेट पिचवर हा सामना खेळवण्यात आला. हुंडेकरी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पायनियरच्या गोलंदाजांनी हुंडेकरीचे सलामीवीर मोहसीन काझी (११ धावा) व ओंकार येवले (१६ धावा) यांना झटपट बाद केले. त्यानंतर कर्णधार अझिम काझी याने संघाचा डाव सावरत २६ चेंडूत ३७ धावांची आतषबाजी खेळी केली. त्याला हमजा सय्यदने (२२ चेंडूत ३६ धावा) याने चांगली साथ दिली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर हुंडेकरी ॲकॅडमीने २० षटकांत ८ गडी गमावत १७१ धावा केल्या. पायनियर संघाकडून प्रणव कांबळे, सोहम धुमाळ, देवरुत खोसे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

अचूक गोलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण (T-20 Cricket)
१७२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पायनियर संघाची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर अनिकेत पटारेने अवघ्या २७ चेंडूंत ४३ धावा जमवल्या. मात्र, हुंडेकरी ॲकॅडमीच्या अचूक गोलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होण्याचा क्रम सुरू राहिला. मानव काटे (२८ चेंडूत ४६ धावा) याने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो संघासाठी विजय खेचून आणू शकला नाही. पायनियरचा संपूर्ण संघ २० षटकांमध्ये ८ गड्यांच्या मोबदल्यात १५६ धावाच जमवू शकला. हुंडेकरी ॲकॅडमीकडून शुभम शिंदे, किरण चोरमले, अभिजित दुधे व आदिनाथ गायकवाड यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
अवश्य वाचा : राहुरी नगरपरिषदेची पोलीस बंदोबस्तात पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई

पारितोषिक वितरण (T-20 Cricket)
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आय लव्ह नगरचे संस्थापक उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आर्मड कोअर सेंटर अॅण्ड स्कूलचे मेजर जनरल विक्रम वर्मा, ब्रिगेडिअर अजय दलाल, साहिल बोगावत, मेहेरप्रकाश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत निंबळकच्या शिवराज वॉरिअर्स संघाचा महेश कंटाळे मालिकावीर, ॲड. शिवराज आनंदकर वॉरिअर्सचा सिद्धार्थ भगत उत्कृष्ट फलंदाज तर पायनियरचा देवरुत खोसे उत्कृष्ट गालंदाज ठरला. शुभम शिंदे हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला.