T20 World Cup : भारताच्या टी-20 विश्वचषक मोहिमेचा आज श्रीगणेशा

T20 World Cup : भारताच्या टी-20 विश्वचषक मोहिमेचा आज श्रीगणेशा

0
T20 World Cup
T20 World Cup : भारताच्या टी-20 विश्वचषक मोहिमेचा आज श्रीगणेशा

T20 World Cup : नगर : भारताच्या टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) मोहिमेचा आज श्रीगणेशा होत आहे. या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताची (India) सलामीची लढत आज आयर्लंडविरुद्ध होत आहे. हा सामना स्थानिक म्हणजेच न्यूयॉर्कच्या वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल, तर भारतात हा सामना रात्री 8 वाजल्यापासून पाहायला मिळेल.नवख्या अमेरिका (America) संघाने सराव सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. तसेच वेस्ट इंडीजला पपुआ न्यू गिनी संघाने विजयासाठी दिलेली कडवी झुंज दिल्याने भारतीय संघ आयर्लंड संघाविरुद्ध सर्व ताकदीनिशी खेळून दमदार विजयासाठी प्रयत्न करेल.

T20 World Cup
T20 World Cup : भारताच्या टी-20 विश्वचषक मोहिमेचा आज श्रीगणेशा

हे देखील वाचा: साताऱ्यात शरद पवार गटाला ‘पिपाणी’चा फटका

भारत विरुध्द पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा

सर्व भारतीयांना ९ जून रोजी होणाऱ्या भारत विरुध्द पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा असली, तरी आयर्लंडसमोरचा सामनाही महत्त्वाचा आहे. आयर्लंड संघाकडे ॲण्डी बेलबर्नी आणि हॅरी टॅक्टर हे तगडे आक्रमक फलंदाज आहेत. पॉल स्टर्लिंग आणि डॉकरेलसारखे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत आणि गोलंदाजीत बऱ्यापैकी विविधता आहे. भारत आणि आयर्लंडदरम्यान आत्तापर्यंत झालेल्या ८ सामन्यांत एकदाही भारतीय संघ पराभूत झालेला नाही. तरीही रोहित शर्माने कोणतीही गोष्ट गृहीत न धरता भारतीय संघ मोठा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. 

T20 World Cup
T20 World Cup : भारताच्या टी-20 विश्वचषक मोहिमेचा आज श्रीगणेशा

नक्की वाचा: विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर!

रोहित शर्मासह सलामीला कोण येणार, याची उत्सुकता

भारतीय संघाकडून रोहित शर्मासह सलामीला कोण येणार, याची उत्सुकता कायम आहे. खेळपट्टी बघता जयस्वाल रोहितसह सलामीला येईल. नंतर कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या फलंदाजीला येतील.

T20 World Cup
T20 World Cup 2024

सामन्याला असणार प्रेक्षकांची भरपूर गर्दी (T20 World Cup)

त्यानंतर चार गोलंदाजांच्यात दोन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज असतील, अशीच शक्यता वाटत आहे. आयरिश फलंदाजांना फिरकी खेळताना होणारा त्रास विचार करता जडेजाला कुलदीप यादवची साथ मिळेल, असे वाटते. भारत विरुध्द आयर्लंड सामन्याला प्रेक्षकांची भरपूर गर्दी होणार आहे. ज्या रसिक प्रेक्षकांना भारत विरुध्द पाकिस्तान सामन्याची तिकिटे मिळाली नाहीत, त्यांनी या सामन्यावर उडी मारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here