T20 World Cup : नगर : भारताच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने (India Under-19 Women’s Cricket Team) टी-२० विश्वचषक जिंकला आहे. क्वालालंपूर येथे काल (रविवारी) खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात कर्णधार निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून सहज पराभव केला. भारतीय (India) संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
नक्की वाचा : …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’;शिवराज राक्षेचं वक्तव्य
त्रिशाची ३३ चेंडूत ८ चौकारांसह ४४ धावांची नाबाद खेळी
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या विक्रमी कामगिरी करणाऱ्या सलामी जोडीने चांगलीच सुरुवात केली. कमालिनी ८ धावा करत लवकर बाद झाली. यानंतर उपकर्णधार सानिका चाळके आणि गोंगाडी त्रिशा हिने चांगली भागीदारी रचत भारताला मोठा विजय मिळवून दिला. त्रिशाने ३३ चेंडूत ८ चौकारांसह ४४ धावांची नाबाद खेळी केली. तर सानिका चाळकेने २२ चेंडूत ४ चौकारांसह २६ धावांची खेळी केली आणि विजयी चौकारासह भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. गोंगाडी त्रिशा हिने गोलंदाजीतही ३ विकेट्स घेतल्या.
अवश्य वाचा : सत्यजित तांबे यांना आदर्श युवा आमदार पुरस्कार प्रदान
बीसीसीआयकडून ५ कोटीचे बक्षीस जाहीर (T20 World Cup)
वरिष्ठ खेळाडूंप्रमाणे आयसीसीने हे विजेतेपद जिंकण्यासाठी विजेत्या संघाला कोणतेही रोख बक्षीस दिले नाही. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वविजेत्या संघाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयने ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. संघातील सर्व १५ खेळाडू, मुख्य प्रशिक्षक नूशीन अल खदीर आणि सपोर्ट स्टाफमधील इतर सदस्यांमध्ये हे बक्षीस वितरित केले जाईल.