IND vs AFG:टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय;सूर्या-बुमराहची तुफानी खेळी

टी २० विश्वचषक २०२४ (T20 World Cup 2024) च्या स्पर्धेत सुपर ८ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs Afg) यांच्यात सामना झाला. यामध्ये भारताने अफगाणिस्तानला ऑल आऊट करत ४७ धावांनी मोठा विजय मिळवला आहे.

0
IND vs AFG :टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय;सूर्या-बुमराहची तुफानी खेळी
IND vs AFG :टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय;सूर्या-बुमराहची तुफानी खेळी

नगर : टी २० विश्वचषक २०२४ (T20 World Cup 2024) च्या स्पर्धेत सुपर ८ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs Afg) यांच्यात सामना झाला. यामध्ये भारताने अफगाणिस्तानला ऑल आऊट करत ४७ धावांनी मोठा विजय मिळवला आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह समोर अफगाणिस्तानचे फलंदाज नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून गोलंदाज जसप्रीत बुमराहने ४ षटकांत ७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादवने ४ षटकांत ३२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी १ विकेट पटकावली. अर्शदीपने ४ षटकांत ३६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

नक्की वाचा : राज्यात पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता  

अफगाणिस्तानचा खेळ खराब  (IND vs AFG)

अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १८२  धावांचे लक्ष्य होते. रहमानउल्ला गुरबाजने केवळ ११ धावा केल्यानंतर यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद केल्याने संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाची धावसंख्या २३ होती तेव्हा प्रथम इब्राहिम झद्रान आणि हजरतुल्ला झाझाई याने केवळ ३ चेंडूत २ धावा करून बाद झाले. संघाने २३ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. यानंतर अजमतुल्ला उमरझाई आणि गुलबदीन नायब यांनी संघाची कमान सांभाळली आणि १० षटकांत संघाची धावसंख्या ६६ धावांवर नेली.

११ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर १७ धावा करून गुलबदीन बाद झाला. त्यानंतर अवघ्या ४ चेंडूत उमरझाई २६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. अफगाणिस्तानने १५  षटकांत ५ गडी गमावून १०१ धावा केल्या. त्यांना शेवटच्या ३० चेंडूत ८१ धावा करायच्या होत्या. १७ व्या षटकात नबीने वेगवान खेळण्याचा प्रयत्न केला आणि षटकार मारला पण दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद झाला. अफगाणिस्तानला शेवटच्या २ षटकात ६७ धावा करायच्या होत्या, जे जवळजवळ अशक्य होते. शेवटच्या २ षटकात फक्त ९ धावा आल्या, त्यामुळे भारताने हा सामना ४७ धावांनी जिंकला.

अवश्य वाचा : धक्कादायक! तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक (IND vs AFG)

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ८ विकेट्स गमावत १८१ धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५३ धावा केल्या. भारताचा रोहित शर्मा ८, विराट कोहली २४ आणि ऋषभ पंत २० धावा करत बाद झाला. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान समोर भारताचे सलामीवीर गडगडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने चांगली भागिदारी करत भारताचा डाव सावरला. सूर्यकुमारने २८ चेंडूत ५३ धावा केल्या. तर हार्दिक पांड्या २४ चेंडूत ३२ धावा करत बाद झाला. तर अफगाणिस्तानकडून राशिद खानने ३, फजलहक फारुकी ३ आणि नवीन उल हकने १ विकेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here