नगर : संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या महिला टी २० विश्वचषक २०२४ (Womens T20 World Cup) साठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या संघाचे नेतृत्व करणार आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. तर मराठमोळ्या स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नक्की वाचा : ‘पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते’- संजय राऊत
३ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या महिला ट्वेंटी- ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने दुबई आणि शाहजाह येथे खेळवले जाणार आहेत. शेफाली वर्मा, राधा यादव आणि जेमिमा रोड्रिग्ज यांनाही टीम इंडियात स्थान मिळाले आहे. महिला टी २० विश्वचषकाची सुरुवात ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारताचा सलामीचा सामना न्यूझीलंडच्या महिला संघासोबत होणार आहे. हा सामना ४ ऑक्टोबर रोजी यूएईमध्ये पार पडेल.
अवश्य वाचा :‘आम्ही सगळयांनाच पक्षात घेणार नाही,थर्मामीटर लावून पाहू कोण योग्य’- अनिल देशमुख
भारतीय संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर (T20 World Cup 2024)
महिला टी २० विश्वचषकातील भारतीय संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, ऋचा घोष आणि यास्तिका भाटिया या अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, हेमलता, शोभना आणि राधा यादव यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल. श्रीलंका आणि स्कॉटलंड हे आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत दाखल झाले आहेत.
प्रत्येक संघ गटात चार सामने खेळतील. त्यातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. १७ व १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. २० ऑक्टोबरला फायलन दुबईत होईल आणि उपांत्य फेरी व अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहेत. भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास तेसेमी फायनल १ मध्ये खेळू शकतील. या स्पर्धेत एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत १० सराव सामने होतील.
आयसीसी महिला टी २० विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ(T20 World Cup 2024):
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्टिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी , रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन