नगर : आयसीसी टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची (World Cup Squad) घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ (Team India) विश्वचषकात उतरणार आहे. तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन भारतीय संघाचे विकेटकीपर असतील.
नक्की वाचा : सॉल्टची अर्धशतकी खेळी;कोलकात्याचा दणदणीत विजय
या संघातून केएल राहुल याचा मात्र पत्ता कट झाला आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, सिराज आणि अर्शदीप सिंह यांना स्थान मिळाले आहे. शिवम दुबे पहिल्यांदाच विश्वचषकात खेळणार आहे. तर शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद यांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
अवश्य वाचा : ‘कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात’;अॅस्ट्राझेनेकाची कबुली
एक जूनपासून सुरू होणार टी 20 विश्वचषकाचा थरार (T20 World Cup 2024)
एक जूनपासून टी 20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयनं टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा केली. रोहित शर्माकडे या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना टॉपचे फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये टॉप 5 फलंदाजांमध्ये ते आहेत. तर गोलंदाज म्हणून कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. या संघाची घोषणा होण्यापूर्वी यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल या दोघांच्या नावाची चर्चा होती. अखेर गिलऐवजी यशस्वीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
टी20 वर्ल्ड कप मध्ये भारताचे सामने कधी? (T20 World Cup 2024)
टी 20 विश्वचषकात भारत अ गटात आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. तर दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध होईल. भारत आणि पाकिस्तान 9 जूनला आमने सामने येणार आहेत. तर भारताचा तिसरा सामना यूएस आणि चौथी सामना 5 जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे.
टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल