नगर : बांगलादेश सरकारने (Bangladesh Govt) भारतात टी-२० वर्ल्ड कप (T20 World Cup 2026) खेळण्यास नकार (Rejection) दिला आहे. आयसीसीने (ICC) बांगलादेशला इशारा देत भारतात टी- २० वर्ल्ड कप खेळावा लागेल, असं सांगितलं होतं. बांगलादेश सरकारच्या निर्णयानुसार, येथील क्रिकेट बोर्डानं यापूर्वी त्यांचे सामने सुरक्षेच्या कारणामुळं श्रीलंकेत खेळवावेत,अशी मागणी केली होती. मात्र,आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत चर्चा केली होती. बांगलादेशच्या बोर्डाला २१ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय कळवण्यासाठी मुदत दिली होती. मात्र बांगलादेश त्यांच्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी भारतात टी- २० वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे.
नक्की वाचा: बापरे!सोनं ४ हजार रुपयांनी स्वस्त,तर चांदीची २० हजार रुपयांनी घसरण
भारतात न खेळण्याचा बांगलादेश सरकारचा निर्णय (T20 World Cup 2026)
बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला भारतीय आयपीएलमधून वगळल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डाने प्रतिष्ठेचा विषय करत त्यांचे सामने श्रीलंकेत खेळवावेत,अशी भूमिका घेतली होती. याशिवाय बांगलादेशनं आयसीसीला त्यांचा ग्रुप बदलण्याची मागणी केली होती. मात्र,बांगलादेशनं केलेली मागणी आयसीसीनं फेटाळून लावली होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणांमुळं बांगलादेश सरकारने भारतात क्रिकेट सामने खेळू नयेत,अशी भूमिका घेतल्याचे सांगितलं. भारतात टी २० वर्ल्ड कप न खेळण्याचा निर्णय बांगलादेश सरकारचा असून तो बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा नसल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
अवश्य वाचा: विद्यार्थ्यांनो ‘अपार आयडी’ काढले का ?,३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत
बांगलादेशनं भारतात न येण्याचा निर्णय का घेतला? (T20 World Cup 2026)
भारत आणि श्रीलंका यांच्याकडून टी २० वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आले आहे. पाकिस्तानचे सामने श्रीलंका येथे खेळवले जाणार आहेत. दुसरीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा विरोध म्हणून भारतात सोशल मीडियावर एक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानला ट्रोल करण्यात आले. केकेआर या संघात बांगलादेशचा क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमान असल्यानं शाहरुख खान विरोधात अनेक पोस्ट करण्यात आल्या होत्या.
या सर्वांची दखल घेत बीसीसीआयनं केके आरला मुस्तफिजूर रहमान याला आयपीएलमधून वगळण्याचे आदेश दिले होते. केकेआरने बीसीसीआयच्या आदेशाचे पालन करत मुस्तफिजूर रहमानला संघातून बाहेर काढलं होतं. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं भारतात टी २० वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास नकार दिला.



