
T20 World Cup : नगर : आगामी आयसीसीच्या टी -२० वर्ल्डकप २०२६ (T20 World Cup) ची तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात (Indian Team) मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातून शुबमन गिलची (Shubman Gill) सुट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. यासह दुखापत हे देखील प्रमुख कारण आहे. त्यामुळे संजू सॅमसन टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करताना दिसू शकतो. यासह रिंकू सिंगला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या इशान किशनला देखील या संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून संधी दिली गेली आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी संघाचा भाग असलेल्या जितेश शर्माला संघाबाहेर करण्यात आलं आहे.
अवश्य वाचा: जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी
स्पर्धेतील अंतिम सामना ८ मार्चला
या स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना ८ मार्चला खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला होता. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ तिसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान शनिवारी (२० डिसेंबर) बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

नक्की वाचा : जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही: मुख्यमंत्री
असा आहे भारतीय संघ : (T20 World Cup)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक).


