T20 World Cup : नगर : टी-२० विश्वचषक (T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत आज (ता. २६) सुपर आठ गटात भारताचा सामना झिम्बाब्वेशी (india vs zimbabwe) झाला. या सामन्यात भारतीय संघाने (Team India) झिम्बाब्वेला ७३ धावांनी पराभूत केले. हा विजय भारतासाठी स्पर्धेतील उपांत्यफेरीतील स्थान निश्चितीचा महत्त्वाचा टप्पा ठरला. झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटने एकाकी लढत दिली. मात्र, त्याला संघासाठी विजय खेचून आणता आला नाही.
नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन
सलामीवीरांची चांगली सुरुवात
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताचा सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. मात्र, भारतीय धावफलकावर ४८ धावा असताना संजीव सॅमसंग (२४ धावा) झेलबाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या इशान किशनने अभिषेक शर्माच्या साथीने संघाच्या धावफलकाला आकार दिला. इशान किशन ३८ धावा काढून बाद झाला. त्या पाठोपाठ अभिषेक शर्माही ३० चेंडूत ५५ धावांची खेळी करत बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादवने ३३ धावा केल्या.
अवश्य वाचा : संगमनेर तहसील कार्यालयाबाहेर लाचखोर लिपीक जेरबंद; एसीबीची कारवाई
२५६ धावांचा डोंगर केला उभा (T20 World Cup)
हार्दिक पांड्या व तिलक वर्माने पाचव्या गड्यासाठी ८४ धावांची नाबाद भागेदारी केली. हार्दिक पांड्याने २३ चेंडूत नाबाद ५० तर तिलक वर्माने १६ चेंडूत नाबाद ४४ धावांची आतिषी खेळी केली. या बळावर भारतीय संघाने २० षटकांत चार गडी गमावत २५६ धावांचा डोंगर उभा केला. झिम्बाब्वेकडून रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, टिनोटेंडा टिनाशे व सिकंदर रझा यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर धावा जमवणे झाले कठीण
२५७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर धावा जमवणे कठीण झाले. मात्र, झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटने एकाकी लढत दिली. त्याने ५९ चेंडूत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ९७ धावांची खेळी केली. मात्र, त्याला विजय खेचून आणता आला नाही. झिम्बाब्वेचा संघ २० षटकांत सहा गडा गमावत १८४ धावाच जमवू शकला. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन तर वरुण चक्रवर्ती, अक्सर पटेल व शुभम दुबेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. झिम्बाब्वेने सर्वाधिक शुभम दुबेच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. शुभमने दोन षटकांत ४६ धावा दिल्या.



