T20 World Cup : नगर :टी-२० विश्वचषक (T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यफेरीत आज (ता. ५) भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) असा चुरशीचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Ground) झाला. या सामन्यात भारताने इंग्लंड संघाला ७ धावांनी नमवत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश मिळवला. आता भारत व न्यूझीलँड यांच्यात रविवारी (ता. ८) अंतिम सामना होणार आहे. इंग्लंडच्या जेकब बेथेलने दिलेल्या एकाकी संघर्षाला यश मिळाले नाही.
नक्की वाचा : राजूर येथे उद्या गाव बंदसह रास्ता रोको
अभिषेक शर्मा अवघ्या नऊ धावांवर बाद
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने सुरुवात चांगली केली मात्र, सलामीवीर अभिषेक शर्मा अवघ्या नऊ धावा करत झेलबाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या इशान किशनला बरोबर घेत सलामीवीर संजीव सॅमसंगने भारतीय संघाच्या धावफलकाला आकार दिला. दोघांनी ९७ धावांची भागीदारी केली.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

चौफेर फटकेबाजी (T20 World Cup)
इशान किशन १८ चेंडूत ३९ धावा काढत बाद झाला. मैदानात आलेल्या शुभम दुबेला बरोबर घेत संजीवने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी सुरूच ठेवली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात संजीव सॅमसंग ४२ चेंडूत ८९ धावा करुन तंबूत परतला. तोपर्यंत भारताच्या धावफलकावर १६० धावा लागल्या होत्या. कर्णधार सूर्यकुमार यादव ११ धावा जोडत परतला. त्यानंतर शुभम दुबे व हार्दिक पंड्याने मैदानाच्या चौफेर चौकार-षटकारांची आतषबाजी केली. शुभमने ४३, हार्दिकने २७ तर तिलक वर्माने २१ धावा केल्या. भारतीय संघाने २० षटकांत सात गडी गमावत २५३ धावा जमविल्या. इंग्लंड करून विल्यम जॅक्स व आदिल रशीदने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

२५४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचा सलामीवीर फिलिप सॉल्ट (५ धावा) व कर्णधार हॅरी ब्रुक (७ धावा) हे दोघे झटपट बाद झाले. मात्र, जोस बटलरला बरोबर घेत जेकब बेथेलने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. बटलर (२५ धावा) बाद झाल्यावर दुसऱ्या बाजूने त्याला भक्कम साथ मिळाली नाही. बेथेलने ४८ चेंडूत १०५ धावा केल्या. तो धाव बाद झाला. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाने २० षटकांत सात गडी गमावत २४६ धावा जमवल्या. भारताकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक दोन तर अर्शदीप सिंग, जसप्रित बुमराह, वरुण चक्रवर्ती व अक्षर पटेलने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.



