T20 World Cup | भारत विश्वविजेता; दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी केला पराभव

0
T20 World Cup
T20 World Cup

T20 World Cup | नगर : विश्वचषक टी२० क्रिकेट (T20 World Cup) स्पर्धेतील आज वेस्टइंडीज येथील बार्बाडोस येथे आज भारत (India) व दक्षिण आफ्रिका या संघात चुरशीचा अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करत १३ वर्षांनंतर टी२० विश्वचषक जिंकला.

नक्की वाचा: राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद; राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अजित पवारांकडून सादर

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी (T20 World Cup)

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर विराट कोहली (५९ चेंडूत ७६ धावा) व अक्षर पटेल (३१ चेंडूत ४७ धावा) यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकांत सात गडीत गमावत १७६ धावा जमवल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज व अॅनरिक नॉर्त्ये यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

अवश्य वाचा: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अकोलेत निदर्शने

विराट कोहलीची टी-२०मधून निवृत्तीची घोषणा (T20 World Cup)

दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉक (३१ चेंडूत ३९ धावा) व हाइनरिक क्लासेन (२७ चेंडूत ५२ धावा) यांनी भारताला चोक प्रत्युत्तर दिले. मात्र, त्यांना विजय खेचून आणता आला नाही. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २० षटकांत आठ गडी गमावत १६९ धावाच करू शकला. भारताकडून हार्दिक पंड्याने तीन, जसप्रीत बुमराह व हर्षदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. विराट कोहली सामनावीर तर बुमराह मालिकावीर ठरला. या सामन्यातील विजयानंतर विराट कोहलीने टी-२० क्रिकेट प्रकारामधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे तो भारतीय संघातून टी-२० खेळताना दिसत नसला तरी आयपीएलमधून तो टी-२० क्रिकेट खेळताना दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here