नगर : क्रिकेट प्रेमींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ (ICC T20 World Cup) आता वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिकेच्या (America) यजमान पदाखाली जूनमध्ये खेळवला जाणार आहे. टी-२० विश्वचषकासाठी भारतासहित इतर अनेक देशांनी आपला संघ जाहीर केला आहे. आयसीसीकडून टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक फार अगोदर घोषित करण्यात आले आहे. पण आता टी-२० वर्ल्डकपसाठी होणाऱ्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
नक्की वाचा : पाणीदार अकोले तालुक्यालाही बसताहेत दुष्काळाच्या झळा
२७ मे पासून सराव सामन्यांना सुरवात (T20 World Cup 2024)
टी-२० विश्वचषकाचे सराव सामने येत्या २७ मे पासून १ जून पर्यंत अमेरिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे खेळवले जातील. विश्वचषकापूर्वी एकूण १६ सराव सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने टेक्सासमधील ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, फ्लोरिडातील ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, क्वीन्स पार्क ओव्हल आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे आयोजित केले जातील.
अवश्य वाचा : वृक्षांचे शहर म्हणून संगमनेरची ओळख : तांबे
भारताचा एकच सराव सामना होणार (T20 World Cup 2024)
आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे. त्यामुळे विश्वचषकात सहभागी होणाऱ्या २० संघांपैकी केवळ १७ संघ सराव सामने खेळत आहेत. या सराव सामन्यांमध्ये टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध एकच सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना १ जूनला होणार आहे. या सराव सामन्यांना आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांचा दर्जा मिळणार नाही. सराव सामन्यांची तिकिटे १६ मे पासून Tickets.t20worldcup.com किंवा नॅशनल क्रिकेट सेंटर आणि क्वीन्स पार्क ओव्हल येथील बॉक्स ऑफिसवर खरेदी करता येतील.
सराव सामन्यांचे वेळापत्रक
सोमवार २७ मे
कॅनडा विरुद्ध नेपाळ, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, टेक्सास
ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो
नामिबिया विरुद्ध युगांडा, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो
मंगळवार २८ मे
श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स, ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, फ्लोरिडा
बांगलादेश वि यूएसए, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, टेक्सास
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया, क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद आणि टोबॅगो
बुधवार २९ मे
दक्षिण आफ्रिका इंट्रा-स्क्वॉड, ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, फ्लोरिडा
अफगाणिस्तान विरुद्ध ओमान, क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद आणि टोबॅगो
गुरुवार ३० मे
नेपाळ वि यूएसए, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, टेक्सास
स्कॉटलंड विरुद्ध युगांडा, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो
नेदरलँड विरुद्ध कॅनडा, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, टेक्सास
नामिबिया विरुद्ध पापुआ न्यू गिनी, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद आणि टोबॅगो
शुक्रवार ३१ मे
आयर्लंड विरुद्ध श्रीलंका, ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, ब्रॉवर्ड काउंटी, फ्लोरिडा
स्कॉटलंड विरुद्ध अफगाणिस्तान, क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद आणि टोबॅगो
शनिवार १ जून
बांगलादेश विरुद्ध भारत: टीबीसी अमेरिका