नगर : बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या मोठी लगीनघाई सुरू आहे. आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, तापसी पन्नूने बॉयफ्रेंड मॅथियास बोई सोबत उदयपूर (Udaypur) येथे गुपचूपपणे लग्नगाठ बांधली आहे. तीने जवळचे नातेवाईक आणि काही मोजक्याच पाहुण्यांना या लग्नाचे निमंत्रण दिले होते. २३ मार्च रोजी हा विवाहसोहळा पार पडला असल्याचे वृत्त आहे.
नक्की वाचा : गुजरातच्या मैदानावर मुंबईचा पराभव;शुभमन गिलची विजयी सुरवात
तापसी आणि मॅथियासने उदयपूरमध्ये गुपचूप लग्न केले आहे. तापसी आणि मॅथियास यांनी लग्नामध्ये दोघांचेही कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतली आहे. तापसी आणि मॅथियास यांच्या लग्नामध्ये फक्त बॉलिवूड दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप यांनी उपस्थिती लावली होती. गेल्या काही दिवसांपासून या कपलच्या लग्नाची चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. पण या कपलने कोणालाही न कळता गुपचूप लग्न उरकलं आहे.सोशल मीडियावर तापसीची बहीण शगुन आणि तिच्या चुलत बहिणीसोबतचा फोटो शेअर करून या जोडप्याच्या लग्नाबाबतचे संकेतही दिले.
तापसीचा नवरा नेमका कोण आहे ? (Taapsee Pannu)
तापसी आणि मॅथियास गेल्या १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे कपल नेहमी सोशल मीडियावर एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतात. पण ते नेहमीच लाइमलाइट पासून दूर राहतात. तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड मॅथियास हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. २०१५ च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे.
अवश्य वाचा : मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तापसीचे चित्रपट ? (Taapsee Pannu)
तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू आणि तमिळ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.२०१० मध्ये तापसीने ‘झुम्मंडी नादम’ या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.२०१३ 3 मध्ये ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटामधून पदार्पण केले होते. ‘जुडवा २’, ‘गेम ओव्हर’, ‘बदला’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ आणि ‘शाबाश मिठू’ अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे.