नगर : मुंबईतील २६/११ हल्ल्याचा (26/11 Mumbai Attack) मास्टरमाईंड असलेल्या तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता (Possibility of being brought to India) आहे. सुरुवातीच्या काळात त्याला दिल्लीतील एनआयए कोठडीत ठेवलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणून खटला चालवला जाऊ शकतो.आज रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन कारागृहात कोठडी तयार केली जात आहे,अशी माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा : अखेर अमेरिकेकडून चीनवर १०४ टक्के टॅरिफ दर लागू!
तहव्वूर राणाला मुंबईत आणणार (Tahawwur Rana )
तहव्वूर राणाला मुंबईत आणले तर आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबला ठेवलेल्या कोठडीत त्याला ठेवलं जाईल,अशी शक्यता वर्तविली जात आहे. अमेरिकेत भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात तहव्वूरला देण्यात आल्याची माहिती आहे. आजच त्याला भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. भारतीय यंत्रणांच्या ताब्यात देण्यास तहव्वूर राणाचा विरोध होता,तशी याचिकाही त्याने अमेरिकन कोर्टात केली होती. मात्र अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानेही ही याचिका फेटाळल्या वर त्याची उरलीसुरली आशाही संपली. आता तहव्वूर राणावर भारतात आणून मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी खटला चालवला जाईल.
अवश्य वाचा : सोन्याचे दर घसरले;तीन दिवसांत ४ हजार रुपयांची घसरण
कोण आहे तहव्वुर राणा?(Tahawwur Rana )
१९६१ मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या तहव्वुर राणाने सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले. १९९० दशकाच्या उत्तरार्धात तो कॅनडाला गेले. कॅनेडियन नागरिकत्व मिळाल्यानंतर, तो शिकागोत स्थायिक झाला, जिथे तो इमिग्रेशन कन्सल्टन्सीसह विविध व्यवसाय चालवत होता. २०००९ मध्ये, राणाला २००८ च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये १६० हून अधिक लोक मारले गेले होते. प्रेषित मुहम्मदचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करणाऱ्या जिलँड्स-पोस्टेनवरील हल्ल्याच्या प्रयत्नाशी ही त्याचा संबंध होता. राणावर १२ गुन्ह्यांचा आरोप होता, ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांच्या हत्येला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे यांचा समावेश होता.