Taluka Police Station : नगर : वाहन तपासणीदरम्यान कारवाई केल्याचा राग मनात धरून मोटार वाहन निरीक्षक (Motor Vehicle Inspector) गीता शेजवळ यांना मोबाईलवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्मी रोडलाईसच्या प्यारे खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल
शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
मोटार वाहन निरीक्षक शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (ता. १२)रात्री अहिल्यानगर ते पुणे महामार्गावर चास शिवारात शेजवळ या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सूरज उबाळे व चालक भीमराव जगताप यांच्यासह वाहन तपासणी करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप व्हॉइस कॉल आला. फोन उचलल्यावर समोरील व्यक्तीने स्वतःचे नाव “आश्मी रोडलाईसचे तथा अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान” असल्याचे सांगितले. त्याने हिंदीत एकेरी भाषेत बोलत, “आपने कुछ देर पहिले मेरी गाडी क्यों रोकी और ड्रायव्हर को मारा? मैं अल्पसंख्यांक आयोग का दर्जे का अध्यक्ष हूं, तुम्हें घर पर बुला सकता हूं.
अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
दंडाच्या रागातून शेजवळ यांना धमकी (Taluka Police Station)
एनएचआय का टोल नाका चलाने के लिये लिया है, उधर शासकीय गाडी कैसे खडी करते हो, यह देखता हूं. तुम्हें आयोग के आगे खडा करता हूं” अशा शब्दांत धमकी दिली. या घटनेनंतर चौकशी केली असता, संबंधित व्यक्तीच्या वाहन क्रमांक या पूर्वीही ओव्हरलोडिंग साठी ई-चलनाद्वारे दंड आकारण्यात आलेला असल्याचे समोर आले. या दंडाच्या रागातूनच शेजवळ यांना फोन करून धमकी दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे शासकीय कर्तव्य बजावताना संबंधित व्यक्तीकडून जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.