Tamhini Ghat Accident:ताम्हिणी घाटात मोठी दुर्घटना;धबधब्यात उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू 

ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा तरुण आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. हा तरुण स्टंट करत वाहून गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

0
Tamhini Ghat Accident:ताम्हिणी घाटात मोठी दुर्घटना;धबधब्यात उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू 
Tamhini Ghat Accident:ताम्हिणी घाटात मोठी दुर्घटना;धबधब्यात उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू 

नगर : वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमला (Lonavala Bhushi Dam) गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची (Death) घटना ताजी असताना पुण्यातील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक दुर्घटना घडली आहे. ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा तरुण आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. हा तरुण स्टंट करत वाहून गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

नक्की वाचा : नसतं साहस जीवावर बेतलं; भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून

माहितीनुसार,स्वप्नील धावडे हा तरुण पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रहिवाशी आहे. तो आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. शनिवारी हा ग्रुप ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता. ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहे.

वाहून गेलेल्या तरुणाचा दोन दिवसांनी मृतदेह सापडला (Tamhini Ghat Accident)

सतत पडणाऱ्या पावसामुळे ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत या परिसरात शोधकार्य सुरू होते. आज (ता.१) सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू होते. यावेळी त्याचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील मानगाव येथे आढळून आला.

अवश्य वाचा : पेपरफुटीतील आराेपींना दहा वर्षांची शिक्षा करा; बाळासाहेब थाेरातांची मागणी

नेमकं काय घडलं?(Tamhini Ghat Accident)

स्वप्नील धावडे आणि त्यांची टीम पावसाळा सुरु होण्यापूर्वी याच कुंडामध्ये पोहण्यासाठी उतरले होते. मात्र तेव्हा पाण्याला फार जोर नव्हता. शनिवारी (ता.२९) ते आणि त्यांची टीम पुन्हा प्लस व्हॅली मधील सर्वात वरच्या कुंडाजवळ गेले. धावडे याने त्यांच्या जीम मधील सहकाऱ्यांसमोर फेसाळत्या पाण्यात उडी मारली. सुरुवातीला त्यांनी काठावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र धबधब्याच्या टोकाला आल्यानंतर त्यांची दगडावरील पकड निसटली आणि ते धबधब्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे ते भारतीय सैन्यात सामील झाले होते. १८  वर्षांच्या सेवेनंतर ते मागील वर्षी निवृत्त झाले होते. पावसाळा सुरू असल्याने अनेकजण ताम्हिणी वन्यजीव अभयरण्यात जातात. परंतु, हे क्षेत्र अपघातप्रवण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here