Tamil Nadu News:मोठी बातमी!तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू

तामिळनाडूतील कल्लाकुरीची (Kallakurichi) जिल्ह्यात बुधवारी (ता.१९) एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू (29 th people Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी दारू (poisonous liquor) प्यायल्याने या लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी व्यक्त केला आहे.

0
Tamil Nadu News:धक्कादायक! तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू
Tamil Nadu News:धक्कादायक! तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू

नगर : तामिळनाडू राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील कल्लाकुरीची (Kallakurichi) जिल्ह्यात बुधवारी (ता.१९) एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू (29 th people Death) झाल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे.आहे. विषारी दारू (poisonous liquor) प्यायल्याने या लोकांचा मृत्यू झाला आहे. कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी ही माहिती दिली आहे. या घटनेतील ७० हून अधिक व्यक्तींना उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल केलं आहे.

नक्की वाचा : माझं लाेकसभेतलं पहिलं भाषण इंग्रजीतच : नीलेश लंके

नेमकी घटना काय ? (Tamil Nadu News)

या घटनेतील या रुग्णांची तपासणी केली असता त्यांनी विषारी दारू प्राशन केल्यामुळे त्यांना हा त्रास झाल्याचा अंदाज रुग्णालय व येथील प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी ही माहिती दिली. या रुग्णांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. मात्र, त्यातील काही रुग्णांची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान २९ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही मोठ्या संख्येनं रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यात अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो,अशी माहिती आहे.
अवश्य वाचा : फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी : मेधा कुलकर्णी

विषारी दारू प्रकरणी एकाला अटक (Tamil Nadu News)

तामिळनाडू पोलिसांनी याप्रकरणी गोविंदराज म्हणजेच कन्नूकुट्टी या व्यक्तीला अटक केली आहे. बेकायदेशीर पद्धतीने दारू विकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या दारूचे नमुने तपासणीसाठी विल्लुपुरम येथे पाठवण्यात आले आहेत. त्यामध्ये विषारी मिथेनॉलचं मोठं प्रमाण असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here