Tango Malhar : साया दाते दिग्दर्शित ‘टँगो मल्हार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Tango Malhar : साया दाते दिग्दर्शित 'टँगो मल्हार' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

0
Tango Malhar : साया दाते दिग्दर्शित 'टँगो मल्हार' चित्रपटाचा ट्रेलर लाँच
Tango Malhar : साया दाते दिग्दर्शित 'टँगो मल्हार' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Tango Malhar : नगर : “टँगो” या अर्जेंटाईन नृत्य प्रकारामुळे चित्रपटाचा (Movie) नायक मल्हार याच्या आयुष्याला मिळालेलं अनोख पण सुखद वळण घेऊन “टँगो मल्हार” (Tango Malhar) हा चित्रपट १९ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या अनोख्या नावामुळे आणि अत्यंत लक्षवेधी अशा ट्रेलरमुळे (Trailer) चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

अवश्य वाचा : दारुबंदीसाठी महिलांचा रुद्रावतार; पोलीस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा

नातेसंबंध, मैत्री, प्रेम अशा भावनांचं चित्रण

सर्वसामान्य आर्थिक स्थिती असलेल्या मल्हार नावाच्या एका रिक्षाचालकाच्या आयुष्यात टँगो हा अर्जेंटाईन नृत्य प्रकार कसा येतो, त्यानंतर त्याला त्या नृत्य प्रकाराबद्दल काय वाटतं, मल्हारचं आयुष्य यामुळे कसं बदलून जातं या आशयावर हा चित्रपट बेतला आहे. त्याबरोबरच नातेसंबंध, मैत्री, प्रेम अशा भावनांचं चित्रणही मनाला भावतं. चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रत्येक फ्रेममधून चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढते.

Tango Malhar : साया दाते दिग्दर्शित 'टँगो मल्हार' चित्रपटाचा ट्रेलर लाँच
Tango Malhar : साया दाते दिग्दर्शित ‘टँगो मल्हार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

नक्की वाचा: शेंडी येथील मोटर्स शोरुम फोडून चोरी करणारे गजाआड

दमदार पटकथेसह संगीत, संकलन, छायांकन (Tango Malhar)

अनोखी संकल्पना, दमदार पटकथेसह संगीत, संकलन, छायांकन अशा तांत्रिक आघाड्यांवरही उत्तम काम झाल्याचं या ट्रेलरमधून जाणवतं. अशा संकल्पनांवर जागतिक स्तरावर उत्तमोत्तम चित्रपट झाले आहेत. आता त्याच तोडीचा एक वेगळा प्रयत्न आणि तो ही मराठी चित्रपटसृष्टीत होतो आहे हे नक्कीच लक्षवेधी आणि अभिमानास्पद आहे.

मूळच्या कम्प्युटर इंजिनिअर आणि उद्योजक असलेल्या साया दाते यांनी “टँगो मल्हार” चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पहिलच पाऊल दमदारपणे टाकलं आहे.साया दाते, मनीष धर्मानी यांनी चित्रपटाचं लेखन, तर साया दाते यांनीच चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी उत्तम रितीने पार पाडली आहे. सुमेध तरडे, ओंकार आठवले यांनी छायांकन, क्षमा पाडळकर यांनी संकलन, तुषार कांगारकर यांनी ध्वनि आरेखन, शार्दूल बापट, उदयन कानडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. नीतेश कांबळे, कीर्ति विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड, मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी, पंकज सोनावणे यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

Trailer Link