Tarrif War:अखेर अमेरिकेकडून चीनवर १०४ टक्के टॅरिफ दर लागू!

0
Tarrif War:अखेर अमेरिकेकडून चीनवर १०४ टक्के टॅरिफ दर लागू!
Tarrif War:अखेर अमेरिकेकडून चीनवर १०४ टक्के टॅरिफ दर लागू!

Tarrif War : जागतिक बाजारपेठेच्या दृष्टीने एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनवर ५० टक्के अतिरिक्त टॅरिफ दर (Tariff rates) लागू केला आहे. त्यामुळे आता चीनवर (China) एकूण १०४ टक्क्यांचा टॅरिफ दर लागू झाला आहे. अमेरिकेत येणाऱ्या चिनी सामानावर आता १०४ टक्के आयात शुल्क (104 percent import duty) लागू होईल. चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम जगातील इतर देशांवर देखील होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार   

व्हाईट हाऊस कडून निर्णय जारी (Tarrif War)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांमधून याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी चीनवर २० टक्के टॅरिफ लावला होता. त्यानंतर,जेव्हा ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली, तेव्हा चीनवर आणखी ३४ टक्के टॅरिफ लागू केला.आता लावण्यात आलेल्या ५० टक्के टॅरिफनंतर एकूण आयात शुल्क १०४ टक्के झाले आहे.

अवश्य वाचा :कोणतही डिपॉझिट घेऊ नका’;पुणे महानगरपालिकेची खासगी रुग्णालयांना नोटीस  

डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाढीला जशास तसे प्रत्युत्तर देत चीनने कर लादल्यामुळे व्यापार युद्ध भडकले आहे. त्यातच चीनने ही करवाढ मागे न घेतल्यास त्यांच्यावर आणखी ५० टक्के कर लादू, असा इशारा ट्रम्प यांनी सोमवारी (ता.७) दिला होता. चीनने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशाऱ्याचा निषेध करत हे अतिरिक्त ५० टक्के शुल्क म्हणजे ‘ब्लॅकमेल’ असल्याचे म्हटले होते.

व्यापार कर युद्धाचा फटका भारतालाही बसणार  (Tarrif War)

चीन व अमेरिकेत चालू असलेल्या या व्यापार कर युद्धाचा फटका अप्रत्यक्षपणे भारताला बसण्याची भीती माहिती व तंत्रतज्ञान विभागाचे केंद्रीय सचिव एस. कृष्णन यांनी व्यक्त केली आहे. चीनवर निर्बंध लादल्यामुळे भारतातून अनेक कंपन्यांची निर्यात वाढून त्यातून भारताला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण त्यापाठोपाठ भारताला फटकाही बसू शकतो,असं एस. कृष्णन म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here