TB : नगर : क्षयरोग (TB) निर्मूलन मोहीम अंतर्गत व्यापक प्रमाणात जनजागृती घडवून आणण्यासाठी विविध शासकीय (Government) विभाग आणि सामाजिक संस्थांनी १०० दिवसांच्या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी ‘नि-क्षय मित्र’ म्हणून मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी (District Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
नक्की वाचा : ‘विरोधकांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला’- देवेंद्र फडणवीस
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेबाबत आढावा बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागनाथ चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश आहेर आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरू करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले (TB)
आरोग्य विभागाने क्षयरोग रुग्ण शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी मोहीम राबवावी, यासाठी तपासणीचे प्रमाण वाढवावे. खाजगी रुग्णालयात क्षयरोग रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर योग्य उपचार होतील याबाबत लक्ष द्यावे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोहिमेबाबत आवश्यक प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. शहरातील झोपडपट्टी भागातही तपासणीचे प्रमाण वाढवावे. औद्योगिक संस्थांचे सहकार्य घेण्याबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.