Teacher Recruitment : डीएड, बीएड पात्रताधारक उमेदवारांची कंत्राटी भरती

Teacher Recruitment

0
Teacher Recruitment
Teacher Recruitment

Teacher Recruitment : नगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड व बीएड (D.Ed, B.Ed) पात्रताधारक उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्राथमिक शिक्षण विभागाने अर्ज मागविले आहेत. जिल्ह्यात सुमारे 70 ते 80 शिक्षकांची मानधनावर नियुक्ती (Teacher Recruitment) केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.

नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी’-रोहित पवार

खुल्या वर्गासाठी 18 ते 38 वर्षे वयोगटांतील उमेदवार पात्र

जिल्ह्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या किती शाळा आहेत, याची माहिती देखील मागविली आहे. तसेच पात्रताधारक डीएड व बीएड उमेदवारांकडूनही अर्ज मागविले आहेत. खुल्या वर्गासाठी 18 ते 38 वर्षे वयोगटांतील उमेदवार पात्र आहेत. मागासवर्गीयांमध्ये वयोमर्यादा 43 वर्षांपर्यंत पात्र असेल. ज्या शाळेत नियुक्ती होणार असेल, तेथील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहील. त्यानंतर, तालुका व जिल्हा या अनुक्रमाने प्राधान्य दिले जाणार आहे.

अवश्य वाचा : अवैध दारू विरोधात महिला आक्रमक; दुकान पेटवले

ही नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल (Teacher Recruitment)

तिला मुदतवाढीचा निर्णय शासकीय स्तरावर होईल. नियुक्त उमेदवारांना प्रतिमहिना 15 हजार रुपये मानधन मिळेल. या पदावर कायम शिक्षकाची नियुक्ती झाल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा समाप्त होणार आहे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटील यांनी ही माहिती दिली.