Teacher’s Day : शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला चांगली दिशा मिळते : छायाताई फिरोदिया

Teacher's Day : शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला चांगली दिशा मिळते : छायाताई फिरोदिया

0
Teacher's Day : शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला चांगली दिशा मिळते : छायाताई फिरोदिया
Teacher's Day : शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला चांगली दिशा मिळते : छायाताई फिरोदिया

Teacher’s Day : नगर : विद्यार्थ्यांच्या (Students) जीवनाला दिशा देण्याचे व त्यांना घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षिकी पेशा हा अतिशय पवित्र पेशा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार उकार व ज्ञान देण्याचे पवित्र कार्य ते करतात. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षण दिले जाते. जय आनंद महावीर युवक मंडळ दरवर्षी शिक्षकांचा गौरव करून खऱ्या अर्थाने शिक्षक दिन (Teacher’s Day) साजरा करीत आहे, असे प्रतिपादन अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या (Ahmednagar Education Society) प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी केले.

नक्की वाचा: मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून वृत्तपत्र छायाचित्रकारास मारहाण; पोलीस अधीक्षकांना निवेदन

शिक्षक दिनानिमित्त शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार

नगर शहरात सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असलेल्या जय आनंद महावीर मंडळाच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या बाई इजरजबाई फिरोदिया प्रशालेतील सर्व शिक्षक, पूर्व प्राथमिक वर्गातील शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्या सुनीता मुथा, मुख्याध्यापिका ज्योती सिसोदिया, मंडळाचे सचिव आनंद मुथा, उपाध्यक्ष राहुल सावदेकर, खजिनदार अमित गांधी, योगेश मुनोत, मनोज गुंदेचा, बाबालाल गांधी, कुंतीलाल राका, अजय गांधी, सत्येन मुथा, सचिन कोठारी, राज मुनोत, शुभम गट्टाणी, ओंकार बिहाणी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

अवश्य वाचा: मनसेच्या दोन गटात अमित ठाकरेंसमोरच वाद?

मुख्याध्यापिका ज्योती सिसोदिया म्हणाल्या, (Teacher’s Day)

शिक्षक दिनानिमित्त जय आनंद महावीर युवक मंडळाने केलेला सन्मान खूप आनंददायी आहे. मंडळाकडून दरवर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो. त्यामुळे उत्साही वाटते. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता अधिकाधिक वाढविण्यासाठी सर्व शिक्षक मिळून नक्कीच प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.


यावेळी शाळेतील गुणवंत शिक्षक पराग विलायते, वैशाली निकम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व जय बालाजी ग्रुप, सातारा आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल वैभव वाघ यांचा छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाळेतील चौथीचे  विद्यार्थी स्वानंद सुडके व स्वरा ठाणगे यांनीही मनोगत व्यक्त करीत शिक्षक दिनाच महत्व सांगितलं. त्यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. परिचय व यादी वाचन शकुंतला देसरडा यांनी केले. राज मुनोत यांनी आभार मानले.