Teachers March : नगर : आमच्याकडील अशैक्षणिक कामे काढून घेऊन आम्हा शिक्षकांना (Teachers) केवळ शिकवू द्यावे, असा आक्रोश करीत जिल्ह्यातील शिक्षकांनी बुधवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयावर (Collector’s Office) मोर्चा (Teachers March) काढला. जिल्ह्यातील शिक्षक सामूहिक रजा देऊन आंदोलनात सहभागी झाले होते. विविध मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
नक्की वाचा: मोठी बातमी! मनोज जरांगेचं उपोषण स्थगित
अशैक्षणिक कामांमुळे शिकविण्यास पुरेसा वेळ नाही
या आंदाेलनात जिल्ह्यातील नऊ हजार शिक्षक सहभागी झाले हाेते. या आक्रोश मोर्चाला खासदार निलेश लंके, आमदार सत्यजित तांबे यांनी पाठिंबा दर्शवीत शिक्षकांच्या प्रत्येक मागणीसाठी आवाज उठवणार असल्याची भावना व्यक्त केली. अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना शिकविण्यास पुरेसा वेळ मिळत नाही.
अवश्य वाचा: अकोले तालुक्यात रंगणार राजकीय संघर्ष
विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण (Teachers March)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण सरकारने आखले आहे की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. विविध प्रकारची सर्वेक्षणे, वेगवेगळ्या ऑनलाइन माहित्यांची लिंक, एक्सेल फाईल तातडीने भरणे आदी कामे माथी मारली आहे. त्यामुळे मुलांना शिकवण्याच्या मूळ कामापासून शिक्षक दूर गेला असल्याचा आरोप जिल्ह्यातील सर्व संघटनांकडून करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे राजेंद्र ठोकळ, बापूसाहेब तांबे, राजेंद्र शिंदे, संजय कळमकर, सीताराम सावंत, बबन गाडेकर आदी उपस्थित हाेते.