Tehsildar Protest : १ डिसेंबरपासून तहसीलदारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

अमरावतीसह राज्यभरातील तहसीलदार (Tehsildar), नायब तहसीलदारांनी येत्‍या १ डिसेंबरपासून काम बंद आंदोलनाचा (work stoppage movement) इशारा दिला आहे.

0
१ डिसेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा

Tehsildar Protest : नगर : अमरावतीसह राज्यभरातील तहसीलदार (Tehsildar), नायब तहसीलदारांनी येत्‍या १ डिसेंबरपासून काम बंद आंदोलनाचा (work stoppage movement) इशारा दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही ‘ग्रेड पे’ ची (Grade Pay) अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्याचा निर्णय तहसीलदारांनी घेतला आहे.

नक्की वाचा : ‘नट म्हणून तुमच्यात माणूसकीचा ओलावा जागृत राहिला पाहिजे’ – दिलीप प्रभावळकर  

राज्यातील ३६ जिल्ह्यात तहसीलदार व नायब तहसीलदार बेमुदत काम बंद आंदोलन करून संपावर जात असल्याचे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे. या अगोदर ३ मार्च २०२३ रोजी राज्यभरातील तहसीलदार नायब तहसीलदार यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारला होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदार संघटनेची मागणी मान्य करत स्वाक्षरी करून राजपत्रित वर्ग २ अधिकाऱ्यांचे  ग्रेड पे ४८०० रुपये वाढवण्याच्या प्रस्तावाला  मंजुरी दिली आहे. मात्र अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने केला आहे.

हेही वाचा : ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यावर वेळोवेळी अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकून त्यांच्याकडून कामे करून घेतली जाते. पगार वाढीच्या बाबतीत मात्र दिरंगाई केली जात आहे. त्यामुळेच नाईलाजाने आम्ही काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला, असे तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान या आंदोलनात सर्व पदाधिकारी, सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here