Tehsildar Strike :तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन 

राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० रुपये करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेकडून आज नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

0
तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन

Strike : नगर : राजपत्रित वर्ग २ (Gazetted Class 2) यांचे ग्रेड पे (Grade Pay) ४८०० रुपये करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार (Deputy Tehsildar) संघटनेकडून आज नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) येथे धरणे आंदोलन (Strike)रण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.

नक्की वाचा : दूध दर वाढीसाठी कर्जतमध्ये आमरण उपोषण

निवेदनात म्हटले आहे की, राजपत्रित वर्ग दोन यांचे ग्रेड पे  ४८०० रुपये करण्यासाठी के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समिती तयार करण्यात आली होती. या समिती समक्ष केलेले सादरीकरण व यापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनावर तत्काळ कारवाई करावी, यासंदर्भांतील आदेश शासनाने लवकरात लवकर काढावेत. संघटनेने अगोदरही शासनाला निवेदन दिले होते. मात्र , अद्यापही नायब तहसीलदार संवर्गाच्या ग्रेड वेतन वाढीबाबत शासन स्तरावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

अवश्य वाचा :  कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी प्रशासनाची बैठक

ग्रेड पे मंजूर झालेले नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्याबाबत संघटनेला निर्णय घ्यावा लागत आहे. हे आंदोलन सुरू करण्याबाबत व आंदोलनाचे टप्पे निश्चित करण्याबाबत राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. नायब तहसीलदार संवर्गाच्या ग्रेड वेतन वाढीबाबत तत्काळ कारवाई पूर्ण करून त्याच्या अंमलबजावणी संदर्भातील आदेश काढावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदनावर कार्याध्यक्ष सुरेश बगळे, सचिव बाळासाहेब वाकचौरे, सह कोषाध्यक्ष मनोहर पोटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here