नगर : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे सशक्त पैलू उलगडून दाखविले आहेत. प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता ‘अहो विक्रमार्का’ (Aho Vikramaarka) या दाक्षिणात्य अॅक्शनपटात (South Movie) महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात वीरांगणा ‘भवानी’ ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटातील तिचा लूक समोर आला आहे.
नक्की वाचा : अंकुश चौधरीने केली’साडे माडे तीन’ची घोषणा;सिक्वेल येणार
अहो विक्रमार्का’ ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार (Tejaswini Pandit)
दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा यांच्या आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर सहा भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात नेमके काय ? (Tejaswini Pandit)
अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान दाखवत पोलिसांच्या शौर्याला, खाकी वर्दीतल्या हिरोंना सलाम करणारा ‘अहो विक्रमार्का’ हा चित्रपट आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता देव गिल या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. धडाकेबाज अॅक्शन सीन, नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि कुटुंबामधील प्रभावी नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘अहो विक्रमार्का’ हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. हा दाक्षिणात्य सिनेमा असला तरी तो मराठीत देखील प्रदर्शित होणार आहे.
अवश्य वाचा : ‘राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं’-रोहित पवार
आरती देविंदर गिल, मिहिर कुलकर्णी आणि अश्विनीकुमार मिश्रा निर्मित या चित्रपटाची कथा पेनमेत्सा प्रसाद वर्मा यांची आहे, तर संगीत रवी बसरूर आणि आर्को प्रावो मुखर्जी यांनी दिले आहे. छायांकन करम चावला आणि गुरु प्रसाद एन यांनी केले आहे आणि संकलन तम्मीराजू यांनी केले आहे. आता दाक्षिणात्य आणि मराठी कलाकार चित्रपटात काय कमाल करतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी सांगते की, ‘कोणत्याही नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करताना कलाकारांसाठी त्यातील आव्हान ही सुखावह असतात. त्यातही आपली मातृभाषा नसलेल्या इतर चित्रपटांमध्ये काम करताना हे आव्हान अधिक कठीण असते. ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात सगळ्यात मोठं भाषेचे आव्हान होते कारण केवळ भाषा नव्हे तर त्याचं व्याकरण सुद्धा समजून घ्यावं लागतं. मला माझ्या संवादात प्रत्येक शब्दामागील अर्थ आणि लहेजा समजून-उमजून भूमिका करावी लागत होती. साऊथचे सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ वेळेबाबतीत प्रचंड शिस्तप्रिय आहेत. त्यांचा साधेपणा मला खूप भावला. आजवर माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी मला चांगला प्रतिसाद दिला असून ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातील माझ्या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील याची मला खात्री आहे.