Television : नगर : अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) सुप्रसिद्ध गायिका व नृत्यगुरू वर्षा पंडित तसेच नगरचे ज्येष्ठ संगीत समीक्षक चंद्रकांत पंडित यांची कन्या नताशा हिचा चेन्नई दूरदर्शन (Doordarshan) वर नृत्याचा (Dance) विशेष कार्यक्रम नुकताच सादर झाला. नताशाने गेल्या १३ वर्षांपासून चेन्नई येथे राहून भरतनाट्यम नृत्यात (Bharatanatyam Dance) प्रावीण्य मिळवले आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर मधील तालमींचा इतिहास
‘कलाक्षेत्र फाउंडेशन’ या जगविख्यात संस्थेमधून पदवी
अहिल्यानगरमधून नृत्य विशारद झाल्यानंतर चेन्नई येथील ‘कलाक्षेत्र फाउंडेशन’ या जगविख्यात असलेल्या संस्थेमधून पदवी घेतली. त्यानंतर चेन्नईतील प्रसिद्ध नृत्यगुरू शिजीत कृष्ण यांच्या नामांकीत सहृदय फाउंडेशन संस्थेत भरतनाट्यम नृत्य तसेच गायन, वादनाचे पुढील प्रगत शिक्षण घेतले. मागील पाच वर्षे त्याच संस्थेत नृत्य अध्यापक म्हणून कार्यरत आहे.
अवश्य वाचा : …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’; शिवराज राक्षेचं वक्तव्य
नताशाचे तिच्या गुरुंसमवेत अनेक ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम (Television)
तिचा चेन्नईच्या दूरदर्शन चॅनलवर २८ जानेवारीला एकल नृत्याविष्कार प्रसारित झाला. त्याच कार्यक्रमाचा दुसरा भाग ३० जानेवारीला प्रसारित झाला. मागील वर्षीही विद्या भवन मैलापूर येथे एकल नृत्याचे सादरीकरण झाले होते. नताशाचे आजवर तिच्या गुरुंसमवेत चेन्नई, केरळ, बंगळुरू, गोवा ,मुंबई, म्हैसूर, ऊटी, पुणे असे अनेक ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत.