Temperature : राहुरीत ३० वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

Temperature : राहुरीत ३० वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

0
Temperature : राहुरीत ३० वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद
Temperature : राहुरीत ३० वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

Temperature : राहुरी : तीन दशकातील रात्रीच्या नीचांकी तापमानाची (Lowest Temperature) १८ डिसेंबर रोजी नोंद झाली. १८ डिसेंबर रात्रीचे किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस होते. १९९९ च्या नऊ जानेवारीला ३.१ इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर तापमानाचा (Temperature) नीचांकी पारा काल (ता. १७) राहुरी कृषी विद्यापीठाच्या (MPKV Rahuri) हवामान केंद्रात नोंद झाला.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्हा हा गोहत्या मुक्त करण्यासाठी सहकार्य राहील – संग्राम जगताप

उत्तरेची थंड हवा दक्षिणेकडे वाहिल्याने तापमानाचा पारा कमी

३० वर्षांतील दुसऱ्या नीचांकी किमानतापमान १८ डिसेंबरला नोंदले गेले. उत्तरेकडे अरबी समुद्रात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडील थंड हवा दक्षिणेकडे वाहत होती. त्यामुळे तापमानाचा रात्रीचा पारा एकदम कमी झाला असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील भारतीय हवामानशास्त्र विभागाचे डॉ. रवी आंधळे यांनी सांगितले. आणखी दोन ते तीन दिवस थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

अवश्य वाचा : महानगरपालिकेच्या १०० बेडच्या अद्ययावत रुग्णालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात

गहू, हरभरा या पिकांसाठी ही थंडी उपयुक्त (Temperature)

मध्य महाराष्ट्रात हा प्रभाव अधिक होता. तुलनेत दक्षिण महाराष्ट्रात थंडीचा तडाखा तुलनेत कमी होता. गहू, हरभरा या पिकांसाठी ही थंडी उपयुक्त असली तरी द्राक्ष व अन्य फळ पिकांसाठी मात्र, ही थंडी प्रतिकूल ठरणार आहे. थंडीने जनजीवन एकदम गारठून गेले आहे. थंडीचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. सर्दी, खोकला अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच थंडीचे उबदार कपडे, रग, स्वेटर, कानटोप्या यांची देखील मागणी वाढली आहे. रात्री शेकोट्यांचाही आधार घेतला जात आहे. ११ ते १८ डिसेंबर किमान तापमान अंश सेल्सिअस मध्ये असे नोंदले गेले. कमाल तापमानात मात्र विशेष वाढ व घट झालेली नाही ते 27 ते 28°c दरम्यान होते.

मागील आठ दिवसांतील राहुरीचे किमान तापमान
(संख्या अंश सेल्सियस मध्ये)

११ फेब्रुवारी – ७.३

१२ फेब्रुवारी – ९.५

१३ फेब्रुवारी – ९.७

१४ फेब्रुवारी – १०.१

१५ फेब्रुवारी – ९.५

१६ फेब्रुवारी – ८.५

१७ फेब्रुवारी – ७.५

१८ फेब्रुवारी – ६.५