Temperature : कर्जत शहराच्या तापमानाने गाठली चाळीशी; उन्हाच्या तडाख्याने रस्त्यावर अघोषित संचारबंदी

Temperature : कर्जत शहराच्या तापमानाने गाठली चाळीशी; उन्हाच्या तडाख्याने रस्त्यावर अघोषित संचारबंदी

0
Temperature : कर्जत शहराच्या तापमानाने गाठली चाळीशी; उन्हाच्या तडाख्याने रस्त्यावर अघोषित संचारबंदी
Temperature : कर्जत शहराच्या तापमानाने गाठली चाळीशी; उन्हाच्या तडाख्याने रस्त्यावर अघोषित संचारबंदी

Temperature : कर्जत : यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा चांगला जाणवत असून मागील दोन-तीन दिवसांपासून कर्जत शहर आणि तालुक्यात बहुतांश ठिकाणी वाढत्या तापमानामूळे (Temperature) दुपारी १२ पासूनच रस्त्यावर अघोषित संचारबंदी (Curfew) जाणवत आहे. कर्जत शहरात उन्हाने चाळीशी गाठली आहे. त्यामुळे उष्मांघाताचे देखील प्रमाण वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून (Health Department) करण्यात येत आहे.

नक्की वाचा : हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली

दुपारी १२ नंतर अनेक ठिकाणी शुकशुकाट

प्रशासकीय पातळीवर देखील प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी गावनिहाय टंचाई आढावा घेण्याच्या सूचना तालुका प्रशासनास दिल्या आहेत. यंदा उन्हाची तीव्रता मार्च मध्यानापासूनच सर्वाधिक जाणवत आहे. वातावरणातील कमालीच्या बदलामुळे एप्रिल महिन्यात उन्हााची तीव्रता आणि दाहकता वाढली आहे. कर्जत शहराचे तापमान जवळपास ४० अंश सेल्शियशच्या आसपास गेल्याने दुपारी १२ नंतर अनेक ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. सर्वसामान्य नागरिक वाढत्या उन्हामुळे घराबाहेर पडताना दिसत नाही. यामुळे दुपारी १ ते ४ पर्यंत शहरासह ग्रामीण भागात देखील व्यवहार बंद ठेवले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत देखील शाळा प्रशासनाने बदल केला आहे. वाढत्या उन्हामुळे उष्मांघाताचे प्रमाण वाढले असून विशेष करून लहान बालक आणि जेष्ठ नागरिकांनी खबरदारी घेणे अनिवार्य आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन (Temperature)

गारवा निर्माण करण्यासाठी वातानुकूलित यंत्र, एसी, कुलर साधनांची मागणी वाढली आहे. यासह थंड पेयाची दुकाने सजली असून, नागरीक कुटुंबासह संध्याकाळी फिरणे पसंत करीत आहे. शक्यतो उन्हात फिरणे, प्रवास करणे टाळावे. महत्वाचे काम असल्यास, शेतीचे कष्टाचे काम करताना अंगात सुती कापडे यासह डोळ्यास गॉगल, डोक्यात टोपी, उपरणे अथवा स्कार्फ बांधणे आवश्यक आहे. या काळात भरपूर पाणी पिणे योग्य असून तेलकट पदार्थ, तिखट खाणे टाळावे. डी-हायड्रेशन जाणवत असल्यास लिंबू सरबत प्यावे. असे वैद्यकीय अधिकारी सल्ला देत आहे. लघवीला जळजळ होणे, उन्हाळी लागणे यावर तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी यांनी केले.

मागील वर्षी अवकाळी आणि मान्सून पावसाने कर्जत तालुक्यात जोरदार हजेरी लावली. यामुळे नैसर्गिक पाण्याचे जलस्रोतात पाण्याची पातळी चांगली आहे. मात्र सध्याच्या उन्हाच्या वाढत्या तापमानाने त्यात घट होऊ शकते. या अनुषंगाने कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी तालुका प्रशासनास जल व्यवस्थापनाबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासह अवैध आणि अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यावर करडी नजर ठेवत उचित कार्यवाहीचे निर्देश दिले आहे.