Temporary Ban on Tourism : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी

Temporary Ban on Tourism : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी

0
Temporary Ban on Tourism : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी
Temporary Ban on Tourism : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी

Temporary Ban on Tourism : अकोले: तालुक्यातील हरिश्चंद्रगड (Harishchandragad), रतनगड आणि साम्रद येथील सांधण दरी ही प्रसिद्ध पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरती बंद (Temporary Ban on Tourism) करण्यात आली आहेत. नाशिक वन्यजीव विभागाने पावसाळ्यात वाढलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

अवश्य वाचा : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना

प्रचंड गारवा आणि दृश्यमानतेचा अभाव

सध्या भंडारदरा, हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून, निसर्गाने देखणे रूप धारण केले आहे. धबधबे, ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत तर रस्ते धुक्याने झाकले जात आहेत. यामुळे प्रचंड गारवा आणि दृश्यमानतेचा अभाव जाणवत आहे. विशेषतः आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सांधण दरी पावसाळ्यात अधिकच धोकादायक ठरते.

नक्की वाचा : शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार

अनुचित घटना घडू नये यासाठी प्रवेशास बंदी (Temporary Ban on Tourism)

येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी व चेरापुंजीसारख्या पावसाचा आनंद घेण्यासाठी केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर शेजारील नाशिक, पुणे, मुंबई या परिसरातून दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र मागील वर्षी धुक्यामुळे वाट चुकून एक पर्यटक मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर या परिसरात या कालवाधीत अनेक छोट्या-मोठ्या घटना, दुर्घटना घडत असतात. त्यामुळे यंदा कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वन विभागाने कठोर पावले उचलली आहेत. अतिपावसामुळे या धोकादायक स्थळांवर प्रवेशास बंदी घालण्यात आली असून, पर्यटकांनी याठिकाणी जाण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वन विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच स्थानिक गार्डमार्फत सतत सूचना दिल्या जात आहेत. फलकही लावण्यात आले आहेत, अशी माहिती कळसूबाई-भंडारदरा-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल रुपेश गावित आणि प्रतिभा सोनवणे यांनी दिली.