Terrible Accident : उंबरे परिसरात रिक्षा व बसचा भीषण अपघात; तीनजण जागीच ठार

Terrible Accident : उंबरे परिसरात रिक्षा व बसचा भीषण अपघात; तीनजण जागीच ठार

0
Terrible Accident : उंबरे परिसरात रिक्षा व बसचा भीषण अपघात; तीनजण जागीच ठार
Terrible Accident : उंबरे परिसरात रिक्षा व बसचा भीषण अपघात; तीनजण जागीच ठार

Terrible Accident : राहुरी : तालुक्यातील उंबरे परिसरात आज (ता.६) सायंकाळच्या दरम्यान तीन चाकी रिक्षा व ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात (Terrible Accident) होऊन या अपघातात तीनजण जागीच ठार (Killed on the spot) झाले. तर अनेक जण गंभीर जखमी (Seriously injured) झाल्याची घटना घडली.

अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ

ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर अपघात

राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात असलेल्या तांबे पेट्रोल पंपाजवळ आज (ता.६) सायंकाळी ४.१५ वाजे दरम्यान नाशिक येथील काही तरुण तीन चाकी रिक्षामधून शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी एक खाजगी ट्रॅव्हल बस शिंगणापूर येथून राहुरीकडे येत होती. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादात तीन चाकी रिक्षा व ट्रॅव्हल बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला. धडक दिल्यानंतर ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.

Terrible Accident : उंबरे परिसरात रिक्षा व बसचा भीषण अपघात; तीनजण जागीच ठार
Terrible Accident : उंबरे परिसरात रिक्षा व बसचा भीषण अपघात; तीनजण जागीच ठार

नक्की वाचा : निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास काय होणार ?

अनेक जण गंभीर जखमी (Terrible Accident)

या अपघातात रिक्षामधील तीनजण जागीच ठार झाल्याचे माहिती समोर येत आहे. तर रिक्षा मधील इतर तरुण व ट्रॅव्हल्स मधील काही भाविक असे अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. परिसरातील काही तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. राहुरी येथील भागवत वराळे, बाळासाहेब वराळ, प्रथमेश वराळे, आकाश लहांनगे, सचिन जाधव आदी रुग्णवाहिका चालक रुग्णवाहिका घेऊन तातडीने घटनास्थळी हजर झाले. आणि जखमींना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन तरुणांना मयत घोषित केले. तर जखमी झालेल्या अनेक जणांना इतरत्र खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातस्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता, असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.