Terrible Accident : श्रीगोंदा : देशाची सेवा करून काही दिवसांच्या सुटीसाठी आपल्या गावी आलेल्या एका लष्करी जवानावर (Army Soldier) काळाने घाला घातला आहे. नगर–सोलापूर महामार्गावर (Nagar-Solapur Highway) वाळुंज गावाजवळ पाटबंधारे विभागाच्या वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत (Terrible Accident) जवान साईनाथ इंगळे (वय २८, रा. पिसोरे, ता. श्रीगोंदा) यांचा जागीच मृत्यू झाला.
नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा
श्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त
या घटनेमुळे संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.लष्करी सेवेत कार्यरत असलेले साईनाथ इंगळे हे सध्या सुटीवर आले होते. गुरुवारी काही वैयक्तिक कामासाठी ते आपल्या मोपेडवरून (दुचाकी) अहिल्यानगरच्या दिशेने जात होते. वाळुंज गावाच्या शिवारात आले असता, पाटबंधारे विभागाच्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
हे देखील वाचा: बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?
प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Terrible Accident)
ही धडक इतकी भीषण होती की, साईनाथ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.



