Terrible Fire : संगमनेर औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

Terrible Fire : संगमनेर औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

0
Terrible Fire : संगमनेर औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
Terrible Fire : संगमनेर औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

Terrible Fire : संगमनेर: औद्योगिक वसाहतीतील (Industrial Sector) बीझ इंटरनॅशनल (डोअर्स बोर्ड व प्लायवूड) कंपनीला अचानक लागलेल्या भीषण आगीत (Terrible Fire) कंपनीचे पत्र्याचे शेड, दरवाजे, लाकूड, फ्लाय कोअर, विनियर, इलेक्ट्रिकल व केमिकल साहित्य, तसेच स्टमेंट प्लांट मशिनरी पूर्णपणे जळून खाक झाली.

अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद

एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान

या आगीत सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. १५ डिसेंबरच्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कंपनीला आग लागल्याची माहिती सुरक्षारक्षकांनी दिली.आगीची माहिती मिळताच संगमनेर, अकोले, सिन्नर व प्रवरा नगर येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी

नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात (Terrible Fire)

तब्बल नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत कंपनीतील बहुतांश साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले होते. या घटनेबाबत कपिल चांडक यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात जळीत म्हणून नोंद करण्यात आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here