Terrorist : नगर : जम्मू कश्मीरची निवडणूक (Jammu And Kashmir Election) नुकतीच संपली आहे. त्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग जंगलात भारतीय लष्कराच्या (Indian Army) दोन जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. अपहरण झालेल्या दोन जवानांपैकी एकजण दहशतवाद्यांच्या (Terrorist) तावडीतून कसा तरी सुटका करून घेण्यात यशस्वी झाला, तर दुसऱ्या जवानाचा शोध घेतल्यानंतर मृतदेह सापडला आहे.
अवश्य वाचा: १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये सामावून घेणार-भरत गोगावले
रात्रभर जवानाचा घेण्यात येत होता शोध
सैन्य विभागाकडून अपहरण झालेल्या हिलाल अहमद भट या जवानाचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात आली. घटना घडल्यानंतर रात्रभर या बेपत्ता जवानाचा शोध घेण्यात येत होता. कोकरनाग जंगलात शोध मोहीम सुरु असताना या जवानाचा मृतदेह लष्कराला आढळून आला आहे. हिलाल अहमद भट याचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अपहरण केलेले जवान दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी होते.
नक्की वाचा : देशातील गरिबांना पुढील चार वर्षे मोफत धान्य मिळणार,मोदी सरकारचा निर्णय
एक जवान पळून येण्यात यशस्वी (Terrorist)
सविस्तर माहिती अशी की, लष्कराला अनंतनाग जंगलात दहशतवाद्यांच्या कारवाईची माहिती मिळाली होती. लष्कराने शोध मोहीम सुरु केली होती. त्यासाठी सैन्याला पाठवले होते. मात्र, त्यानंतर अचानक दहशतवाद्यांनी दोन जवानांचे अपहरण केले. अपहरण झालेल्या दोन जवानांपैकी एक पळून येण्यास यशस्वी झाला. दहशतवाद्यांकडून त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्याच्या खांद्याला दुखापत झाली पण तो जवान कसाबसा त्यांच्या तावडीतून पळून येण्यात यशस्वी झाला. जखमी झालेल्या जवानाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर बेपत्ता जवानाचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.