TET Exam : नगर : जिल्ह्यातील २७६ परीक्षा केंद्रांवर (Exam Center) २१ हजार ४३१ परीक्षार्थीनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (TET Exam) दिली. तर १ हजार ४१९ जणांनी दांडी मारली. यामध्ये पेपर क्रमांक १ ला ५७२, तर पेपर क्रमांक २ ला ८४७ परीक्षार्थी (Examinees) अनुपस्थित राहिले होते. रविवारी पेपर क्रमांक १ व पेपर क्रमांक २ असे दोन पेपर सीसीटिव्हीच्या निगराणीत पार पडले.
अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा
२२ हजार ८५० उमेदवारांची टीईटी परीक्षा
जिल्ह्यातील २२ हजार ८५० उमेदवारांनी यंदा टीईटी परीक्षेसाठी अर्ज केले होते. यात पेपर क्रमांक १ साठी ९ हजार ६०९ व पेपर क्र. २ साठी १३ हजार २४१ परीक्षार्थीचे अर्ज आले होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार
बायोमेट्रिक प्रणालीव्दारे परीक्षार्थीची उपस्थिती (TET Exam)
परीक्षेतील बोगस विद्यार्थी टाळण्यासाठी परीक्षार्थीची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीव्दारे करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षा दालनात, केंद्राच्या प्रवेशव्दारावर व केंद्र संचालक यांचे नियंत्रण कक्षात सी. सी. टी. व्ही. यंत्रणा बसविण्यात आली होती. परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे नियंत्रण अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सहनियंत्रण अधिकारी व उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची जिल्हा परिरक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
परीक्षेस अहिल्यानगर शहर व शहरालगत पेपर क्रमांक १ साठी २५ व पेपर क्रमांक २ साठी ४४ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. परीक्षेसाठी पेपर क्रमांक १ साठी ६ झोनल अधिकारी, २५ सहायक परीरक्षक, २५ केंद्रसंचालक, जिल्ह्यातील २७६ परीक्षा केंद्रांवर २१ हजार ४३१ परीक्षार्थीनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दिली. ४ उप केंद्रसंचालक, ८४ पर्यवेक्षक व ४०५ समावेक्षक आणि पेपर क्रमांक २ साठी ११ झोनल अधिकारी, ४४ सहायक परीरक्षक, ४४ केंद्रसंचालक, ४ उप केंद्रसंचालक, ११४ पर्यवेक्षक, ५६१ समावेक्षक यांची नियुक्ती केली होती.



