Teacher Recruitment : बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत सुधार करण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आता टीईटी (TET) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आले आहे.

0
Teacher Recruitment
Teacher Recruitment

नगर : महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत सुधार करण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आता टीईटी (TET) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आले आहे.

नव्या धोरणानुसार ‘एनसीटीई’ने तसा आदेश राज्यांच्या शिक्षण सचिवांसह सीबीएसई अध्यक्षांना दिला आहे. २०२४- २५ या शैक्षणिक वर्षांपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याआधी आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी करणे अनिवार्य होतं. सुरुवातीला हा निर्णय फक्त केंद्रीय स्तरावर लागू करण्यात येणार आहे. त्याला राज्यही आपल्या व्यवस्थेत सामील करणार आहे.

नक्की वाचा : काँग्रेसचा राजीनामा दिल्यावर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया   

राष्ट्रीय संमेलनात घोषणा (Teacher Recruitment)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने सोमवारी शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा केली. राष्ट्रीय संमेलनात याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण नीती २०२० (एनईपी) वर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय शिक्षण नीतीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुधारणांवर चर्चा करण्यासाठी यावेळी विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर शिक्षक पात्रता चाचणीची घोषणा करण्यात आली आहे. सीबीएसईसोबत हा निर्णय घेण्यात आलाय. सध्या केंद्रीय स्तरावर याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने प्रत्येक राज्यात या निर्णयाची  अमंलबजावणी होईल.

अवश्य वाचा : अभिनेत्री प्राजक्ता माळीची आता ‘भिशी मित्र मंडळ’मध्ये एंट्री 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here