PM Kisan Scheme:पीएम किसानचा १८ वा हफ्ता ‘या’दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 

0
PM Kisan Scheme:पीएम किसानचा १८ वा हफ्ता 'या' दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 
PM Kisan Scheme:पीएम किसानचा १८ वा हफ्ता 'या' दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 

Pm kisan Scheme : देशभरातील शेतकऱ्यांची प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Scheme) १८ व्या हप्त्याची (Installment) प्रतीक्षा संपली आहे. आता पीएम किसानच्या वेबसाईटनुसार,येत्या पाच ऑक्टोबरला योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २ हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाणार आहे.

नक्की वाचा : कॉपी करण्यासाठी माजी मंत्र्याने नेमला कन्सल्टंट : रोहित पवार

शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक (PM Kisan Scheme)

पीएम किसान सन्मान योजनेतून आतापर्यंत १७ हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांना ३४ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. आता पीएम किसान च्या वेबसाईटनुसार ५ ऑक्टोबरला योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २ हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाईल. या योजनेद्वारे एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यात ६ हजार रुपये पाठवले जातात. मात्र, शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. ई केवायसी केले नसल्यास त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा १८ वा हप्ता मिळणार नाही.

अवश्य वाचा : मोठी बातमी!पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपयांची रक्कम एका हप्त्यात दिली जाते. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या १७ व्या हप्त्याची रक्कम जून महिन्यात मिळाली होती. आता पुढील हफ्त्याची रक्कम मिळणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेतून आर्थिक रक्कम मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचं बँक खातं आणि आधार क्रमांक लिंक करुन घेणं आवश्यक आहे. तसेच जमीन पडताळणी देखील करुन घेणं आवश्यक आहे.

ई केवायसी कुठं करणार ? (PM Kisan Scheme)

ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. तिथं ई केवायसी या पर्यायावर क्लिक करावं. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ओटीपी बेस्ड ई केवायसी हा पर्याय दिसेल. इथं तुम्हाला आधार क्रमांक नोंदवावा लागेल. आधार क्रमांक नोंदवल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर ओटीपी मिळेल. ओटीपी नोंदवल्यानंतर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. जर, तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईटला भेट देऊन ई केवायसी करता आली नाही तर नागरी सुविधा केंद्रात भेट देऊन अर्ज सादर करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here