The Bengal Files Movie:’काश्मीरने रडवले होते,आता बंगाल घाबरवेल’;‘द बंगाल फाइल्स’ चा टीझर प्रदर्शित!

0
The Bengal Files Movie:'काश्मीरने रडवले होते,आता बंगाल घाबरवेल';‘द बंगाल फाइल्स’ चा टीझर प्रदर्शित!
The Bengal Files Movie:'काश्मीरने रडवले होते,आता बंगाल घाबरवेल';‘द बंगाल फाइल्स’ चा टीझर प्रदर्शित!

The Bengal Files Movie : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचार प्रवर्तक सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री त्यांचा पुढील चित्रपटद बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’ (The Bengal Files) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा अधिकृत टीझर (Teaser Relesed) आता प्रदर्शित झाला आहे.हा चित्रपट यापूर्वी ‘द दिल्ली फाइल्स’ (Delhi Files) या नावाने ओळखली जात होती, मात्र आता तिचे नाव बदलून ‘द बंगाल फाइल्स’ ठेवण्यात आले आहे. याआधी त्यांनी ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ सारखे वादग्रस्त पण वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत.

नक्की वाचा : राज्यात ‘या’ दिवशी पडणार मुसळधार पाऊस;मुंबईसह ठाणे व रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा    

टीझरमध्ये नेमकं काय ? (The Bengal Files Movie)

‘द बंगाल फाइल्स’ च्या टीझरमध्ये देशाच्या इतिहासातील एक भितीदायक बाजू पुन्हा एकदा समोर येतोय. प्रभावशाली व्हिज्युअल्स आणि भावना यांनी भरलेली ही झलक सांगून जाते की, हा चित्रपट अत्यंत परिणामकारक आणि अंतःकरणाला भिडणारा असणार आहे. अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटात  मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार हे नावाजलेले कलाकार यात झळकणार आहेत. टीझरमध्ये दाखवलेले दृश्य प्रेक्षकांना अस्वस्थ करणारे आहेत, जे या कथानकाच्या खोलीची आणि वास्तवतेची झलक देतात.

काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या पहिल्या टीझरमध्ये मिथुन चक्रवर्ती एकट्याने एका ओसाड आणि अंधाऱ्या कॉरिडॉरमधून जाताना दिसतात.त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावर गंभीरता स्पष्ट दिसते आणि जळालेल्या आवाजात ते भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचताना दिसतात, हे दृश्य प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करून जाते.

हेही पहा : अहिल्यानगरच्या भूषण भाटियांची दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक कामगिरी

चित्रपट कधी होणार प्रदर्शित ? (The Bengal Files Movie)

‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाची कथा विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलेली असून, याची निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी केली आहे. हा चित्रपट आई एम बुद्धा प्रोडक्शन्स आणि तेज नारायण अग्रवाल यांच्या सादरीकरणात बनवण्यात आला आहे आणि ‘फाइल्स ट्रिलॉजी’ चा हा शेवटचा भाग असेल, ज्यामध्ये आधीचे ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ समाविष्ट आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.