The Department of Slaughterhouses | नगर : संगमनेर शहरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणी (The Department of Slaughterhouses) कारवाई करत आठ लाख ६८ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गोमांस व इतर मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
हे वाचा – जनगणनेचे काम अचूक पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
संशयित आरोपीचे नाव (The Department of Slaughterhouses)
निजम अय्याज कुरेशी (वय २१, रा. गल्ली नं.०२ मदिनानगर, संगमनेर), निसार रहेमान कुरेशी (वय ३०, रा. गल्ली संगमनेर), मोसीन असलम कुरेशी (वय २५, रा. गल्ली नं.०१ कादरीनगर, संगमनेर, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा अजमत लतिफ कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर, कासिफ अनवर कुरेशी रा.मदिनानगर, संगमनेर (पसार), यांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्यांच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: मोबाईल व घरातील दागिने घेऊन नवरी पसार; पाथर्डी तालुक्यातील घटना
गोवंशी जनावरांची कत्तल (The Department of Slaughterhouses)
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडून तीन लाख १५ हजार किमतीचे १ हजार ५० किलो गोमास, व गुन्ह्यात वापरलेले वाहन असे पाच लाख ५० हजार, व इतर साहित्य असा एकुण आठ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरात गोवंशी जनावरांची कत्तल होत असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, विजय पवार, योगेश कर्डिले, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांच्या पथकाने केली.



