Ladki Bahin Yoajana:’लाडकी बहीण’योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता ‘या’ महिन्यात जमा होणार

0
Ladki Bahin Yoajana:'लाडकी बहीण'योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता 'या' महिन्यात जमा होणार
Ladki Bahin Yoajana:'लाडकी बहीण'योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता 'या' महिन्यात जमा होणार

Ladki bahin Yoajana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतिमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रच मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अशी घोषणा केली आहे.

नक्की वाचा : ठरलं तर मग!हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार    

नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात मिळणार (Ladki Bahin Yoajana)

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. नवरात्रोत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत भाष्य केले होते. भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे नोव्हेंबर महिन्याचे १५०० रुपये ऑक्टोबर महिन्यात देण्यात येतील, असे अजित पवार म्हणाले होते. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात लाडक्या बहिणींना एकूण ३००० रुपये मिळणार आहेत.

सहा ते सात दिवसांत योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार (Ladki Bahin Yoajana)

अजित पवार यांनी घोषणा करताना हे ३००० रुपये महिलांच्या बँक खात्यावर कधीपर्यंत येतील,हेही सांगितले होते.त्यांनी सांगितल्यानुसार येत्या १० ऑक्टोबरपर्यंत महिलांना हे ३००० रुपये मिळणार आहेत. म्हणजेच साधारण सहा ते सात दिवसांत लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरूवात होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना जुलै महिन्यापासून देण्यात येत आहे.

ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना जुलै महिन्याचे पैसे देण्यात आले होते. कागदपत्रांची त्रुटी किंवा अन्य कारणामुळे पैसे न मिळालेल्या महिलांना या दोन्ही महिन्याचे ३००० रुपये सप्टेंबर महिन्यात देण्यात आले होते. म्हणजेच महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत. आता ऑक्टोबर महिन्यात आगामी दोन हप्यांचे पैसे दिले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here