Weather Update : राज्यात पहाटे आणि रात्रीचा हलका गारवा वगळता थंडी (Cold) पूर्णपणे गायब झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या (Heat) तीव्र झळा लागून उकाड्याने नागरिक हैराण झालेत. राज्यात येत्या काही दिवसात उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तापमानातील वाढ कायम राहणार असली तरीही इशान्य भारतात मात्र पावसाला (Rain)पोषक वातावरण तयार झाले आहे.
नक्की वाचा : भगवद् गीतेवर हात ठेवून काश पटेल यांनी घेतली एफबीआयच्या संचालक पदाची शपथ
२३ आणि २४ फेब्रुवारीला मराठवाड्यात पावसाच्या सरी (Weather Update)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक भागात जाणवणार आहे येत्या २३ आणि २४ फेब्रुवारीला दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे. उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे व शुष्क राहणार असून येत्या दोन दिवसात हळूहळू तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
अवश्य वाचा : १९४७ ला १ रुपयात मिळणाऱ्या वस्तू आता किती रुपयात मिळतात?
तापमन कुठे किती ?(Weather Update)
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही.उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस किमान तापमान एक ते दोन अंशांनी कमी होईल. त्यानंतर मात्र तापमानात हळूहळू दोन ते तीन अंशांनी वाढ होईल. विदर्भात कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. विदर्भातील चंद्रपूर येथे शुक्रवारी (ता.२१) सर्वाधिक ३८.३ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तर वर्धा येथेही ३७.७ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.